मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार..? हवामान विभागाने दिली माहिती….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “मागील काही दिवसांपासून राज्यासह देशात वळवाचा पाऊस सुरू आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनला सुरूवात होईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला होता. पण, जून महिन्याची आठ तारीख आली पण अजूनही अनेक ठिकाणी वळवाचा पाऊस सुरू आहे.
दरम्यान, हवामान विभागाने मान्सूनबाबत मोठी अपडेट दिली.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली आणि वायव्य भारतात सुमारे एक आठवडा उष्णतेची लाट राहील. त्यानंतर पाऊस पडण्याची शक्यता आहे. आयएमडीनुसार, पुढील पाच दिवसांत दिल्लीत तापमानाचा पारा ३-४ अंश सेल्सिअसने वाढेल. शनिवारी येथील तापमान ४० अंशांच्या आसपास पोहोचले होते.
‘मान्सून’बाबत मोठी अपडेट
गेल्या एका आठवड्यापासून मान्सून पुढे गेलेला नाही. कोरड्या हवेच्या अडथळ्यामुळे २९ मे पासून मान्सून पुढे गेलेला नाही. आता १२ ते १८ जून या आठवड्यात मान्सून पुढे सरकेल असा अंदाज आहे. देशातील अनेक भागांमध्ये अजूनही तेवढी उष्णता झालेली नाही. याचे कारण नैऋत्य मान्सूनचे लवकर आगमन आहे. साधारणपणे जूनच्या अखेरीस मान्सून देशाच्या वेगवेगळ्या भागात पोहोचतो. तो ८ जुलैपर्यंत संपूर्ण देशात पोहोचतो. दिल्लीत मान्सूनच्या आगमनाची तारीख साधारणपणे २७ जून असते. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे माजी सचिव एम. राजीवन म्हणाले की, १२ जूनपर्यंत मान्सून खूपच कमकुवत राहील. याचे कारण कमकुवत मान्सूनचा प्रवाह आणि वायव्य दिशेकडून कोरड्या हवेचा प्रवेश आहे. आता मान्सूनच्या प्रगतीदरम्यान बराच विराम दिसून आला आहे. जूनच्या तिसऱ्या आठवड्यात मान्सून पुन्हा पुढे सरकेल, असंही ते म्हणाले.
दरम्यान, भारतीय हवामान खात्याने विविध राज्यांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे . यामध्ये पंजाब, हरयाणा, चंदीगड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि पश्चिम राजस्थानचा समावेश आहे. आयएमडीचे शास्त्रज्ञ नरेश कुमार म्हणाले की, देशाच्या विविध भागांमध्ये तापमान सामान्यपेक्षा कमी असले तरी, पुढील चार ते पाच दिवसांत ते बदलेल. राजस्थानमध्ये ९ जूनपासून आणि पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या काही भागात १० जूनपासून उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..