महागाव शहर अंधारात ; महावितरणचा भोंगळ कारभाराने अनेक कार्यालयाची कामे ठप्प ; शेतकऱ्यांचे हाल ; आ. ससाणेचे दुर्लक्ष
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ :
महागाव शहरातील वादग्रस्त असलेल्या महावितरण कार्यालयाच्या भोंगळ कारभाराने जनता त्रस्त झाली आहे. विजेचा लपंडाव आणि अधिकाऱ्यांची लबाडीने शासकीय व निमशासकीय कार्यालयचा कामकाजाचा दिवस कोरडा गेल्याने शेतकऱ्यांचे हाल होत आहेत.याकडे मात्र स्थानिक लोकप्रतिनीधीसह विद्यमान आमदार नामदेव ससाणे यांनी दुर्लक्ष केल्याने शेतकऱ्यांत रोष व्यक्त केल्या जात आहे.
तालुका विकासाच्या दृष्टीने मागे असला तरी अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराने महागाव तालुक्याची बकाल अवस्था होत चालली आहे.स्थानिक विधानसभेत आमदारांचा चेहरा बदलला असला तरी महावितरण विभागाच्या कारभाराला लगाम लावण्यासाठी स्थानिक आमदार नामदेव ससाणे अपयशी ठरल्याचे चित्र स्पष्ट आहे.उपकार्यकारी अभियंता यांचे कर्मचाऱ्यांवरील नियंत्रण सुटल्याने मागील दोन दिवसापासून शहरात अंधार पसरला आहे . उपकार्यकारी अभियंता विनोद चव्हाण यवतमाळ वरून कारभार पाहत असल्याने शहरवासीयांना त्रास सहन करावा लागत आहे.
एकीकडे शेतकऱ्यांचा पीक विमा भरण्यासाठी लगबग सुरू असताना अनेक कार्यालयातील संगणक विजे अभावी बंद पडल्याने शेतकऱ्यांना आल्या पावली परत जावे लागले. शहरातील बँकेची कामे होऊ शकली नाहीत.दहावी आणि बारावी च्या निकाल नंतर विद्यार्थी आणि पालक आपल्या पाल्यांसाठी शिक्षणासाठी लागणारे कागदपत्रे काढावी लागत असल्याने तहसील कार्यालयातील सेतू सुविधा केंद्र सुद्धा विजे अभावी बंद पडल्याने विद्यार्थी, शेतकरी,आणि व्यापाऱ्यांना महावितरण विभागाच्या भोंगळ कारभाराचा फटका बसला आहे.
.