भारतीय जवानांकडून ड्रोन हल्ल्याला प्रत्युत्तर….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- “भारत-पाकिस्तानमध्ये सध्या तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळत आहे. भारताच्या जम्मू, जैसलमेर आणि अमृतसरमध्ये पाकिस्तानकडून ड्रोन हल्ला करण्यात आला. या हल्ल्याचे प्रयत्न भारताने हाणून पाडले आहेत.
भारताच्या हवाई सुरक्षा प्रणालीने जम्मूमधील अनेक ड्रोन नष्ट केले आहेत. यानंतर भारताने आक्रमक पवित्रा घेत पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे. भारताने पाकिस्तानातील लाहोरमध्ये ड्रोन हल्ला केला आहे.
भारताने पाकिस्तानच्या हल्ल्यांना जोरदार प्रत्युत्तर देत पाकिस्तानच्या लाहोरवर ड्रोन हल्ला केला आहे. भारताकडून हवाई हल्ले चढवण्यात आले आहे. लाहोर शहरातील डिफेन्स सिस्टीम भारताने खाक केली आहे. या हल्ल्यांनंतर लाहोरमध्ये तातडीने वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. भारताने लाहोरमध्ये अनेक ठिकाणी हल्ले केले जात आहे.
भारतीय जवानांकडून ड्रोन हल्ल्याला प्रत्युत्तर
पाकिस्तानाकडून रात्री ९ च्या आसपास जम्मू आणि आसपासच्या भागात ड्रोनने हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पाकिस्तानने जम्मूच्या आरएसपुरा आणि अरनिया सेक्टरमध्ये घुसखोरी करून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र भारतीय जवानांनी तो त्वरित उधळून लावला. त्यानंतर राजौरी आणि पुंछमध्येही पाकिस्तानने हल्ल्याचा प्रयत्न केला, पण भारतीय जवानांनी त्यांना चोख उत्तर दिले. पाकिस्तान या कुरापतीमुळे जम्मू, काश्मीर, लेह, पंजाबमधील अमृतसर शहरात रात्री ९:०० ते सकाळी ५:०० पर्यंत वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. यासोबतच पंजाबच्या सीमावर्ती भागांमध्येही ब्लॅकआऊट लागू करण्यात आला आहे.
पाकिस्तानकडून ड्रोन हल्ला केल्यानतंर पार्श्वभूमीनंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी तातडीने उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. यावेळी तिन्ही सैन्य दलांच्या प्रमुखांसोबत परिस्थितीचा आढावा घेत आहेत. तसेच पाकिस्तानच्या हल्ल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे.
अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट
जम्मू-काश्मीर ते गुजरात या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये आणि हवाई स्थानकांच्या परिसरात रात्री १२:०० ते पहाटे ४:०० पर्यंत ब्लॅकआऊट (वीजपुरवठा खंडित) करण्यात येणार आहे. श्रीनगर, मोहाली, पंचकुला आणि चंदीगडमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट लागू करण्यात आला आहे. तसेच, राजस्थानमधील जोधपुरमध्ये रात्री १२:३० ते पहाटे ४ वाजेपर्यंत वीजपुरवठा बंद राहील.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..