डॉ . बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार श्रीलंका येथे प्रोफेसर डॉ.अनिल काळबांडे यांना जाहीर….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
उमरखेड :- महाराष्ट्र सहज देशविदेशात आपल्या व्याख्यानांनी नावाजलेले साहित्यिक, विचारवंत प्रबोधनकार तथा आपल्या सामाजिक कार्यासाठी प्रसिद्ध असलेले मिलिंद महाविद्यालय मुळाव्याचे प्रोफेसर डॉ . अनिल काळबांडे यांना त्यांनी आजपर्यंत केलेल्या साहित्य, सामाजिक , सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या कार्याची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेऊन जागतिक आंबेडकरवादी महामंडळाच्या वतीने दिनांक 17 व 18 मे रोजी श्रीलंकेतील कोलंबो या शहरात होणाऱ्या पाचव्या जागतिक आंबेडकरवादी साहित्य संमेलनात मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात येणार आहे . शिवराय ,फुले, शाहू आंबेडकर यांच्या सह महापुरुषांच्या वैचारिक विचाराचा वारसा लाभलेले, जवळपास आपल्या अमोघ भाषा शैलीने दोन हजाराच्या वर कुठलेही मानधन न घेता महापुरुषांच्या विचारांची व्याख्यान देणारे, त्याचबरोबर जवळपास 14 वेळा विदेशामध्ये मराठी भाषेचा प्रचार विश्व मराठी शब्द साहित्य संमेलनाच्या माध्यमातून करणारे तथा आंबेडकरी विचाराच्या माध्यमातून विचारांची पेरणी करणारे प्रसिद्ध साहित्यिक प्रोफेसर काळबांडे यांच्या योगदानाबद्दल श्रीलंका या देशात होणाऱ्या कोलंबो शहरांमधील संमेलनात प्रख्यात साहित्यिक डॉ . विद्याधर बनसोड यांच्या अध्यक्षतेखाली तर श्रीलंकेचे सहकार मंत्री सरांना गुणवर्धना यांच्या उद्घाटनात तर प्राचार्यडॉ. नागनाथ पाटील स्वागताध्यक्ष तथा श्रीलंका येथील भदंत विमल धम्मो , मुंबईच्या समाजवादी नेत्या पद्मा पाटील त्याचबरोबर जागतिक आंबेडकरी वादी महामंडळाचे अध्यक्ष डॉ . दीपककुमार खोब्रागडे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र देऊन डॉ.काळबांडे यांचा गौरव करण्यात येणार आहे . प्रोफेसर काळबांडे यांना विद्यार्थी दशेपासूनच सामाजिक सेवेची आवड असल्याने त्यांना आतापर्यंत अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .त्यात अस्मितादर्श उत्कृष्ट काव्य पुरस्कार , प्रबुद्ध भारत साहित्यरत्न पुरस्कार ,डॉ . बाबासाहेब आंबेडकर जीवन गौरव पुरस्कार, डॉ . बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार, डॉ . बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल एक्सलंस अवार्ड (दिल्ली ) अखिल भारतीय आंबेडकर साहित्य संमेलनात प्रा . राजा ढाले वैचारिक लेखन पुरस्कार, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नॅशनल एक्सलंस अवार्ड ( वेस्ट बंगाल ) महाकवी वामनदादा कर्डक उत्कृष्ट साहित्य पुरस्कार यांच्यासह ) जवळपास २०० पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला . यापूर्वीही त्यांना दुबई ,मलेशिया , थायलंड येथे डॉ . बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलेले आहे . त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे .