भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय ; ३२ विमानतळावरील उड्डाणे १५ मे पर्यंत बंद….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- “पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबल्यानंतर पाकिस्तानकडून भारताच्या दिशेने ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
मात्र, या ड्रोन हल्ल्याला भारतीय लष्कर जशास तसं प्रत्युत्तर देत आहे. शुक्रवारी रात्री (९ मे) पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवरील जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला ते गुजरातमधील भुजपर्यंत तब्बल २६ ठिकाणी ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण हा प्रयत्न भारतीय जवानांनी हानून पाडला.
भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत केलेल्या कारवाईनंतर संभाव्य धोका पाहता भारत सरकार अलर्ट मोडवर आहे. ३२ भारतीय विमानतळावरील नागरी उड्डाणे बंद करण्यात आल्याच्या विमानतळामध्ये काही सीमावर्ती भागातील विमानतळांचा समावेश आहे. सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सांगण्यात आली आहे.
कोणते विमानतळ बंद राहतील?
उत्तर आणि पश्चिम भारतातील भारतीय लष्करी छावण्यासह नागरी वस्तीवर देखील पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणात ड्रोन हल्ले करण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे विमानतळांवरील उड्डाणे १५ मेपर्यंत बंद करण्यात आले आहेत. यापैकी बहुतेक विमानतळांना मोठ्या प्रमाणात सुरक्षा देखील तैनात करण्यात आलेली आहे. यामध्ये श्रीनगर, जम्मू, लेह, अमृतसर, चंदीगड, अंबाला, लुधियाना, जोधपूर, बिकानेर, जैसलमेर, उत्तरलाई, राजकोट, भुज, जामनगर, धर्मशाला, बठिंडा, पटियाला, पठाणकोट, शिमला, किशनगड, हिंडन, पोरबंदर, मुंद्रा आणि कांडला येथील विमानतळांचा समावेश आहे.
दरम्यान, या कालावधीत या विमानतळांवरील सर्व नागरी उड्डाणे स्थगित राहतील. तसेच भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (AAI) दिल्ली आणि मुंबई उड्डाण माहिती क्षेत्रांमध्ये (FIR) हवाई वाहतूक सेवा (ATS) मार्गांच्या २५ विभागांच्या तात्पुरत्या बंदीचा कालावधीही वाढवला असल्याचं नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने शुक्रवारी उशिरा दिलेल्या निवेदनात म्हटलं असल्याचं वृत्तात म्हटलं आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..