शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी ७ मे रोजी सुनावणी तर राष्ट्रवादी प्रकरणी १४ मे रोजी….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणावरील सुनावणी ७ मे रोजी होणार आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह प्रकरणावरील सुनावणी १४ मे रोजी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या वेळापत्रकात ही तारीख नमूद करण्यात आली आहे.
दरम्यान, शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणावर जवळपास दीड वर्षानंतर सुनावणी होण्याची शक्यता आहे.
शिवसेनेत फुट पडल्यानंतर निवडणूक आयोगाच्या वतीने शिवसेना हे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षाचे चिन्ह एकनाथ शिंदे यांना देण्यात आले होते. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरुद्ध फेब्रुवारी २०२३ मध्ये ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानंतर काही तारखा या प्रकरणाच्या पडल्या मात्र सुनावणी होऊ शकली नाही. सप्टेंबर २०२३ पासून हा विषय पटलावर आलेला नाही. नेहमीच तारीख दिली जात होती. मात्र, ती कोणत्या ना कोणत्या कारणाने पुढे जाते. जवळपास दीड वर्षाच्या कालावधीनंतर हे प्रकरण न्यायालयाच्या पटलावर आहे.

बारावीचा ५ मे तर दहावीचा निकाल १५ मेपूर्वी; बोर्डाच्या गुणपत्रिकेवर आता विद्यार्थ्यांचा फोटो अन् क्युआर कोड; १७ मेपासून अकरावी प्रवेश….
शरद पवारांनी आज संध्याकाळी बोलवली पवार कुटुंबाची तातडीची बैठक….
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा….
मुंबई-पुणे मिसिंग लिंक मार्गाला ‘स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर’ नाव द्यावं….
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला..! प्रकाशक प्रशांत आंबींना पोलिसांनी चिखलीतच रोखलं; आंदोलकांची धरपकड….
“.तर चुकीला माफी नाही, हे लक्षात ठेवा”; मुख्यमंत्री फडणवीसांचा लोकप्रतिनिधींना मोठा इशारा….