यवतमाळ : जिल्ह्यात 159 नवीन पॉझेटिव्ह रुग्णांची भर ; दोन मृत्यु तर 79 जणांना रुग्णालयातून सुट्टी
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ, दि. 10 :
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच असून आज (दि. 10) नव्याने 159 पॉझेटिव्ह रुग्णांची भर पडली असून दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला. तसेच आयसोलेशन वॉर्ड आणि विविध कोव्हीड सेंटरमध्ये भरती असलेले 79 जण उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
आज (दि. 10) मृत झालेल्यांमध्ये पुसद शहरातील लक्ष्मीनगर येथील 62 वर्षीय पुरूष व ग्रीन पार्क येथील 60 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या 159 जणांमध्ये पांढरकवडा शहरातील 12 पुरुष व 16 महिला, पांढरकवडा ग्रामीण भागातील पाच पुरूष व चार महिला, उमरखेड शहरातील 24 पुरुष व 14 महिला, उमरखेड ढाणकी भागातील चार पुरूष व दोन महिला, नेर शहरातील पाच पुरुष व चार महिला, नेरजवळील घारफळ येथील एक पुरूष, महागाव शहरातील सात पुरुष व सात महिला, महागाव ग्रामीण मध्ये सेनंद येथे सहा पुरुष व दोन महिला, बेलदरी येथील दोन पुरूष व दोन महिला, यवतमाळ शहरातील 12 पुरुष व 13 महिला असून त्यात दलीत सोसायटी येथील एक पुरूष व एक महिला, शास्री नगर येथील एक पुरूष, मातोश्री नगर येथील दोन पुरूष व दोन महिला, नवप्रभात चौक माळीपुरा येथील दोन पुरूष व दोन महिला, गोधणी रोड येथील तीन महिला, गोदाम फैल येथील एक पुरूष व दोन महिला, लक्ष्मी नगर येथील एक पुरूष, पाटीपुरा येथील दोन पुरूष व एक महिला यांचा समावेष आहे. यवतमाळ ग्रामीणमध्ये बोरगाव येथील एक पुरूष, पुसद शहरातील सुभाष वार्ड येथील एक पुरूष, शिवाजी चौक येथील दोन महिला, गणेश वार्ड येथील एक पुरूष, उदासी वार्ड येथील एक पुरूष व एक महिला, मोती नगर येथील एक पुरूष, गवळी लेआऊट येथील एक महिला, आर्णी शहरातील राणाप्रतापनगर येथील एक महिला, दिग्रस शहरातील शासकीय रुग्णालयाजवळील एक पुरूष, दारव्हा शहरातील आठवडी बाजार येथील एक पुरूषाचा समावेष आहे.
जिल्ह्यात सोमवारी दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु आणि ‘पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह’ झालेल्या 79 जणांना सुट्टी झाल्यामुळे सद्यस्थितीत जिल्ह्यात ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 495 आहे. सुरवातीपासून आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 1758 झाली आहे. यापैकी 1217 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात 46 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात 138 जण भरती आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने सोमवारी 82 नमुने पाठविले असून सुरवातीपासून आतापर्यंत 27789 नमुने पाठविले आहे. यापैकी 26145 प्राप्त तर 1644 अप्राप्त आहेत. तसेच 24387 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.
०००००००

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..