विदर्भ मराठवाड्याला जोडणारा धनोडा टी.पाॕइंट बनला तस्करांचा अड्डा ; जिल्हा पोलीस आधिक्षक व स्थानिक गुन्हे शाखे कडुन विशेष लक्ष देण्याची गरज
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ :
विदर्भ मराठवाडा तसेच तेलंगणा राज्याच्या सिमेला जोडणारा धनोडा टी.पाॕइंट हे मागील अनेक वर्षा पासुन गुन्हेगारी चे केंद्रस्थान बनले आहे. गुटखा ,मादक पदार्था ची तस्करीचा गोरखधंदा मोठ्या प्रमाणावर फोफावल्या ने माफियांच्या अंतर्गत गटबाजीतुन मिळालेल्या माहीती नुसार एक्का दुक्का कारवाई होत असली तरी मोठे मासे पोलीसांच्या गळाला का लागत नाही ? हा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे.
(ता.३० )जुलै रोजी उपविभागिय पोलीस आधिकारी अनुराग जैन (भा.पो.से)यांनी आपल्या ताफ्यासह धनोडा येथील पवन जयस्वाल यांच्या किराणा दुकानावर धाड टाकुन ४ लाख ऐंशी हजाराचा आरोग्यास घातक असलेला प्रतिबंधित गुटखा जप्त करून एका आरोपीस ताब्यात घेतले.न्यायालयाने सुनावलेल्या एक दिवसाच्या कोठडीत पोलीसांनी त्याला पोपटासारखे बोलते केल्या नंतर त्याने आर्णीतील शेख मेहबुब व माहुर येथील कासिफ युसुफ खाकरा या दोन बड्या माफियांची नावे सांगीतली .महीन्याकाठी लाखो रुपयांचा गुटखा तस्करी करणाऱ्या या बड्या माफियांचे कनेक्शन अमरावती व तेलंगणातील आदिलाबाद शी असल्याचेही या कार्यवाहीतुन स्पष्ट झाले.मात्र महाराष्ट्र सरकार ने कठोर निर्णय घेतल्या नंतर सुध्दा प्रशासन व पत्रकारांची मुळीच भिती नसलेल्या गुटखा माफियांचा कायम स्वरुपी बंदोबस्त केंव्हा होणार ? असा सवाल सामान्य जनतेच्या मनात सुरु आहे.
धनोडा येथील कार्यवाही नंतर सहआरोपींना माहीती मिळताच त्यांनी घरातील व गोदामातील गुटखा साठा इतरत्र हटवला आणि अटकपुर्व जामिन मिळविण्यासाठी अमरावती येथील “आश्रय दात्या”कडे पलायन केले. त्यांची जामिन कदाचित कधीना कधी होइल ही मात्र कमी वेळात जास्त माया गोळा करण्याच्या नादात कायदा पायदळी तुडवणारे तस्कर निर्ढावनार व परत जनतेच्या आरोग्याशी खेळ सुरु करणार. विशेषतः महागांव पोलीस ठाणे अंतर्गत धनोडा येथुन राज्यातील लाखो भाविकाःचे श्रध्दास्थान असलेले तिर्थक्षेत्र माहुर केवळ आठ कि.मी.आंतरावर आहे.येथुनच माहुर आणि आर्णीचे चे हे सराइत माफिया तेलंगणातून सारखनी, किनवट मार्गे माहूर , धनोडा, आर्णि येथे लाखोंचा नजर नामक गुटखा तस्करी करतात तर विमल गुटख्याच्या बनावट पुड्यांचा माल अदिलाबाद वरुन येतो हे पोलिसांना माहिती आहे.परिणामी आगदि लहान गावातील पान टपरी व किराणा दुकानातुन हे जिवघेणे तंबाखुजन्य पदार्थ राजेरोसपणे बिनबोभाट विक्री होतात.तरी सुध्दा अन्न आणि औषध प्रशासन तसेच पोलीसांच्या नजरेत कसे येत नाही.दारुच्या व्यसना पेक्षाही वाइट असलेल्या गुटखा सेवनाच्या व्यसनापायी अनेकांच्या संसाराची राख रांगोळी झाली असुन तोंडाच्या व घशाच्या कर्करोगाने अनेक युवक मृत्यू शी झुंझ देत आहेत.२०१८ च्या ३१ डीसेंबर या नववर्षा च्या पुर्व संध्येला माहुर येथुन जवळपास ५० किलो गांजा घेउन जाणारी इंडीका गाडी यवतमाळ स्थानीय गुन्हे शाखेने आरोपी सह ताब्यात घेतली होती.त्यातही मोठे मासे सुटले.नंतर ची कार्यवाही सुध्दा कर्तव्य कठोरपणे कर्तव्यदक्ष उपविभागीय आधिकारी अनुराग जैन यांनी केली .मात्र माहूर आणि महागाव पोलिसांनी आज पर्यंत स्वतः हून तगडी कार्यवाही केली नसल्याने सहाजिकच महागांव व माहुर पोलिसांच्या वर कायदा प्रेमी नागरीकांनी प्रश्नचिन्ह निर्माण केल्यास नवल वाटायला नको.