पुसद शहरात विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण नटवर उंटवाल यांच्या हस्ते उत्साह संपन्न…..

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाढ पुसद येथे गौतम बुद्ध विहार समिती पुसदच्या संयुक्त विद्यमानाने विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पुसद येथील विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक नटवर उंटवाल भगवान धुळे समाजसेवक पांडुरंग उतळे वैभव उबाळे बाळासाहेब खंदारे राज डागर यांची विशेष उपस्थिती होती
सर्वप्रथम विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व भगवान तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे मान्यवराच्या हस्ते पूजन करण्यात आले त्यानंतर सामूहिक बुद्ध वंदनाचा कार्यक्रम घेण्यात आला त्यानंतर नवल बाबा मित्र मंडळाचे अध्यक्ष नटवर उंटवाल यांच्या हस्ते पंचशील ध्वजाचे रीतसर ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर उपस्थित भीमा अनुयायांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमात असंख्य महिलांनी व भीमसैनिकांनी सहभाग घेतला जय भीम च्या नाऱ्याने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला हे विशेष….