बांधवांनो तुमचे व्यसन मला द्या :- सत्यपाल महाराज ; महागाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने प्रबोधनात्मक किर्तन व मान्यवरांचा सन्मान….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
निलेश नरवाडे
महागाव :- व्यसनामुळे कुटुंबाची वाताहत होत असल्याने अनेक कुटुंब देशोधडीला लागले आहेत त्यामुळे हे थांबविण्यासाठी व्यसनाधीन झालेल्या व्यक्तींनी माझ्या समोर व्यसनाचा त्याग करावा असे आवाहन राष्ट्रीय किर्तनकार सप्त खंजेरी वादक सत्यपाल महाराज यांनी केले आहे. महागाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय कीर्तनकार सप्तखंजेरी वादक सत्यपाल महाराज यांच्या प्रबोधनात्मक कीर्तनाचे तसेच समाजहित साधून समाज कार्य करीत असलेल्या मान्यवर मंडळींना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी बोलतांना सत्यपाल महाराज यांनी समाजात व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढले असुन तरुण वर्ग विविध व्यसनांच्या आहारी गेल्याने त्यांची शारीरिक शक्ती कमी होवुन विविध आजार जडत आहेत त्यामुळे महागड्या उपचारापोटी कुटुंबाची आर्थिक स्थिती कमजोर बनत आहे एवढं सर्व करूनही त्यांच्या जगण्याची आशा फार कमी असल्याने व्यसनामुळे अनेक युवकांना आपले प्राण गमवावे लागल्याने त्यांच्या पश्चात कुटुंबाची सुध्दा परवड होत असल्याने हे थांबविणे गरजेचे आहे त्यामुळे तरुण वर्गाने माझ्या समोर व्यसन सोडून व्यसन मुक्त जीवन जगण्याचा मार्ग स्विकारावा तसेच शेतकरी हा जगविणारा आहे तो मरणारा नाही. परिस्थिती कधीच सारखी राहत नाही ती बदलत राहते त्यामुळे शेतकऱ्याने आत्महत्येचा विचार सुध्दा करू नये असे आवाहन सत्यपाल महाराज यांनी केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका जिनिंग प्रेसींगचे अध्यक्ष नगरसेवक संभाजीराव नरवाडे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणुन नितीन भुतडा (भाजप जिल्हा समन्वयक),नगराध्यक्षा सौ सुनंदा दि.कोपरकर, उपनगराध्यक्ष ,शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्रमोद भरवाडे,माजी जि.प.सदस्य साहेबराव पाटील ,काँगेस कमिटीचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव देशमुख,महेंद्र कावळे,अजय पुरोहित, रा. काँ तालुकाध्यक्ष प्रविण पाटील ठाकरे,माजी जि. प.सदस्य अनिल नरवाडे माजी नगराध्यक्षा,नगरसेविका सौ . करूणा ना. शिरबिरे,महेश काळेश्वरकर,नरेंद्र जाधव, नितीन पेंशनवार,शिवसेना तालुका प्रमुख राजु राठोड,दिपक आडे,भाजप मंडळ अध्यक्ष योगेश वाजपेयी,श्रीधर भवानकर,पॉलिटिक्स स्पेशलचे कार्यकारी संपादक यु.एन.वानखेडे, निजधाम संस्थेचे अध्यक्ष वानखेडे,प्रा.शरदचंद्र डोंगरे ,विदर्भ जनआंदोलन समितीचे जगदिश नरवाडे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे संचालन कैलास राऊत यवतमाळ यांनी केले ,प्रास्ताविक महेश कामारकर यांनी केले तर आभार रवी कावळे यांनी मानले.
या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महागाव तालुका पत्रकार संघाचे मार्गदर्शक रितेश पुरोहित,अध्यक्ष महेश कामारकर,उपाध्यक्ष किरण नरवाडे,सचिव रमेश देशमुख, मार्गदर्शक विजय सुर्यवंशी,संजय नागरगोजे,माजी अध्यक्ष संतोष जाधव,ज्ञानेश्वर ठाकरे,रवी कावळे,संजय पाटे,शेरखान पठाण,संजय नरवाडे,निलेश नरवाडे,विशाल डहाळे,विजय देशमुख ,सागर नरवाडे,सौ.केतकी वि.पांडे यांनी अथक परिश्रम घेतले.
मान्यवरांचा करण्यात आला सन्मान….
शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबासह गरजु शेतकरी परिवार यांना बी बियाणे,रासायनिक खते ,नैसर्गिक आपत्तीच्या वेळी सर्वात अग्रेसर राहून पीडितांना जीवनावश्यक वस्तु तसेच आर्थिक मदत करणाऱ्या श्री एकवीरा देवी संस्थानला सामाजिक कार्य पुरस्कार ,
शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होवून त्यांची आर्थिक उन्नती झाली पाहिजे याकरिता त्यांना मार्गदर्शन करणारे अमृत पॅटर्नचे जनक अमृतराव देशमुख,
प्रयोगशील शेतकरी विनोद मैंद यांना कृषी भुषण पुरस्कार, तालुक्यातील पहिल्या महिला कारागृह अधिक्षक बनलेल्या श्रीमती कीर्ती राजेश चिंतामणी यांना तालुका भुषण सन्मान तर आपल्या किर्तन व भागवत कथेच्या माध्यमातून समाजातील हजारो युवकाना व्यसन मुक्त करून त्यांना अध्यात्मिक क्षेत्रात कार्य करण्याची आवड निर्माण करणारे तसेच समाजात व्यसनमुक्तीचे कार्य करून अनेकांचे संसार सुखी करणारे गुरूवर्य हभप तानाजी बापु यांना समाज भुषण पुरस्कार महागाव तालुका पत्रकार संघ व मान्यवरांच्या हस्ते प्रदान करून त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यात आला .तसेच नुकतेच एमबीबीएस चे शिक्षण पुर्ण करुन डॉ.झालेल्या महागाव येथील प्रद्युम्न सुधीर नरवाडे यांचा व त्यांच्या आई वडिलांचा सत्कार सुध्दा पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आला.
सत्यपाल महाराज यांना किर्तन महर्षी किताब प्रदान….
कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करीत असताना समाजातील अंधश्रद्धा ,वाईट चाली,रूढी परंपरा यांवर प्रहार करण्याचे काम तसेच शेतकरी आत्महत्या थांबल्या पाहिजे समाज व्यसनमुक्त बनला पाहिजे याकरिता प्रबोधनाच्या माध्यमातून गेली अनेक दशके कार्य करणारे समाज प्रबोधनकार ,किर्तनकार सप्त खंजेरी वादक सत्यपाल महाराज यांच्या कार्यामुळे प्रभावित होवुन महागाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने सर्व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते त्यांना किर्तन महर्षी किताब देवुन त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यात आला.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..