खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना कोरोनाची लागण
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
विशेष प्रतिनिधी
राज्याचे बांधकाममंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्यानंतर, आमदार मोहन हंबर्डे, आमदार अमरनाथ राजूरकर, आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांना कोरोनाची बाधा झाल्यानंतर आता खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांच्यावर सध्या औरंगाबाद येथील महात्मा गांधी मिशनमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहे. त्यांच्या प्रकृती स्थिर असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.
जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन अटोकाट प्रयत्न करत आहे. शहरासह ग्रामिण भागातही आता ॲटीजन रॅपीड टेस्टद्वारे तपासणी सुरु आहे. त्यामुळे कोरोना बाधीतांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अनेकांचा मृत्यू झाला. कोरोना बाधीतांची संख्या ही तीन हजाराजवळ पोहचली आहे. यात ग्रामिण भागातील नागरिकांसह अधिकारी, कर्मचारी आणि राजकिय मंडळीनाही कोरोनाची बाधा झाली आहे. जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांसह अनेक आमदारांना कोरोनाची लागन झाली आहे. सध्या माधवराव पाटील जवळगावकर आणि आमदार राजूरकर यांच्यावर उपचार सुरू आहेत.
संपर्कातील सर्वच जणांना क्वारंटाईन करण्यात आले
खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे पुत्र जिल्हा परिषद सदस्य प्रविण पाटील चिखलीकर यांना मागील आठवड्यात कोरोनाची बाधा झाली होती. त्यांच्या संपर्कात आल्याने तब्बल आठ ते दहा दिवसांनी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना कोरोनाने घेरले. गुरुवारी रात्री त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. यानंतर त्यांच्या संपर्कातील सर्वच जणांना क्वारंटाईन करण्यात आले असून त्यांचीही तपासणी होणार आहे.