अजित पवारांकडील फायली व्हाया एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्यांकडे जाणार….?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाणार्या सर्व महत्त्वाच्या प्रकरणांच्या फायली आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सादर करण्यात येणार असून, त्यांच्यामार्फत नंतर मुख्यमंत्री फडणवास यांच्याकडे त्या सादर केल्या जाणार आहेत.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निर्देशानुसार याबाबतचे शासकीय आदेश राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी काढले आहेत.
भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने केलेल्या सूचनेनंतर मुख्यमंत्री फडणवीसांना फायलींचा प्रवास शिंदेंच्या मार्फत करण्याच्या सूचना प्रशासनाला द्यावा लागल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. हा शासकीय आदेश म्हणजे एकप्रकारे अजित पवारांनाही धक्का असल्याचे मानले जात आहे. आजवर महत्त्वपूर्ण फायलींच्या या प्रवासातून उपमुख्यमंत्री शिंदे यांना वगळण्यात आले होते. प्रशासकीय निर्णय प्रक्रियेत बाजूला फेकले गेलेल्या शिंदे यांना पुन्हा विश्वासात घेण्याची वेळ सत्ताधार्यांवर आल्याचे यावरून दिसून येते.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….