उद्धव ठाकरेंकडून शिंदेसेनेचं ‘एसंशि’ नामकरण; उपमुख्यमंत्री शिंदेंचा पलटवार, म्हणाले, UT म्हणजे…

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “गेल्या तीन-चार दिवसांपासून उद्धव ठाकरेंनी शिंदेंच्या शिवसेनेला शिवसेना म्हणणेच योग्य नाही, ती गद्दारांची सेना आहे, असं म्हणत शिंदे सेनेला एक नवीन नाव दिलय. सातत्यानं शिंदे गटावर हल्लाबोल करणाऱ्या उद्धव ठाकरेंनी आता शिंदे गटाला केवळ गद्दार नाही तर एसंशिं म्हणण्यास सुरुवात केलीये..ज्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला तोंड फुटलंय.
उद्धव ठाकरे यांनी ‘एसंशि’ असा जो उच्चार केला आहे. त्यावरून आता दोन्ही शिवसेनेत नवा वाद सुरू झालाय आणि त्यावर आता थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही पलटवार केलाय.
2022 मध्ये शिंदे यांनी बंड करून शिवसेनेत फूट घडवून आणली आणि भाजपसोबत युती करत सत्ता स्थापन केली होती. तेव्हापासून उद्धव ठाकरे आणि शिंदे गटात सातत्याने शाब्दिक चकमकी होत आहेत. ठाकरे यांनी यापूर्वीही शिंदे गटाला ‘गद्दार सेना’ संबोधलं होतं.मात्र आता थेट एसंशिं म्हणत ठाकरेंनी शिंदेंना ललकारलंय.
उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्याने शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातील वाद आता आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. तर उद्धव ठाकरेंना कायम उबाठा असे डिवचणाऱ्यांना आता एसंशि हा शब्दप्रयोग बोचायला लागला आहे. या नव्या नावामुळे शिवसेना कोणाची हा जुनाच वाद नव्याने सुरु झाला आहे. त्यामुळे एसंशि विरुद्ध युटी हा वाद कुठपर्यंत जाणार? याकडे लक्ष लागलंय.