पॉलिटिक्स स्पेशल ची जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली दखल ; पुसद दिग्रस पांढरकवडा येथील लॉकडाऊन केले शिथिल
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
रियाज पारेख : ९६३७८८६७७७
पुसद :
.कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी लॉकडाउन हा उपाय आहे काय ? या विषयावर घेण्यात आलेल्या पॉलिटिक्स स्पेशल चे उपविभागीय कार्यालयात डिबेट घेण्यात आली आणि पॉलिटिक्स स्पेशल चे मुख्य संपादक व यांचे सोबत कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी एम.देवेंद्र सिंग यांच्याशी झालेल्या चर्चे नंतर पुसद, पांढरकवडा , दिग्रस शहरात व शहरालगतच्या भागाकरिता ७ ऑगस्टपर्यंत लागू करण्यात आलेली संचारबंदीत जिल्हाधिकारी यांनी इतर तालुक्या प्रमाणे पुसद, पांढरकवडा, दिग्रस शहर व शहरालगतील भागात
शिथिलता देण्याचे आदेश जारी केले आहे.
या मागील पृष्ठभूमि अशी की,
जिल्ह्यातील सहा हॉस्पॉट तालुक्यात संचारबंदी लागू करण्यात आली होती .मात्र जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी जिल्हा प्रशासनाची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केलेल्या चर्चेदरम्यान जिल्ह्यातील नेर, दारव्हा व यवतमाळ या तीन तालुक्यात संचारबंदीत शिथिलता उठविण्याचे एकमत झाले होते. परंतु जिल्ह्यातील पुसद ,पांढरकवडा व दिग्रस शहरात संचारबंदी पुढील आदेशापर्यंत कायम ठेवण्यात आली होती. यावेळी पुसद, पांढरकवडा ,व दिग्रस शहरात सतत लॉकडाऊन मूळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे पॉलिटिक्स स्पेशल ने कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी लॉकडाउन हा उपाय आहे काय? या विषयावर सोशल डिस्टंसिंग पाळत केवळ पाच पक्षीय नेत्यांमध्ये डिबेट घेण्यात आले होते .या डिबेट मध्ये पुसद ,दिग्रस, पांढरकवडा तालुक्यातील लॉकडाउन
उठले पाहिजे या विषयावर बहुतांश नेत्यांचे एकमत झाले होते. यावेळी डिबेट मध्ये झालेल्या चर्चेचे सविस्तर वृत्त पॉलिटिक्स स्पेशल ने बुलेटिन मध्ये जसेच्या तसे मांडले होते.त्यानंतर पॉलिटिक्स स्पेशल चे मुख्य संपादक रितेश पुरोहित यांच्याशी जिल्हाधिकारी यांनी चर्चा केली आणि कर्तव्यदक्ष जिल्हाधिकाऱ्यांनी पॉलिटिक्स स्पेशल चे मुख्य संपादकांना
संचारबंदी उठवत शिथिलता देण्याचे आश्वासन दिले होते .
या आश्वासनाची पूर्तता करत जिल्हाधिकारी एम.देवेंद्र सिं ग यांनी आज याबाबत आदेश जारी करून संचार बंदीत शिथिलता देण्याचे आदेश दिले आहे.आता
जिल्ह्यातील इतर तालुक्या प्रमाणे पुसद,दिग्रस,पांढरकवडा तालुक्यात उद्या (ता . ४ )पासून आदेशात नमूद प्रमाणे दुकाने सकाळी ६ ते ५ या वेळेत सुरू राहणार आहेत.यामुळे गोरगरीब छोटे व्यवसायिक व त्यांचे हातावर पोट आहे त्यांना दिलासा मिळाला आहे.