सहा तालुक्यात पुढील आदेशापर्यंत संचारबंदी कायम तर उर्वरित तालुक्यातील दुकानांच्या वेळेत बदल ; जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह यांचे आदेश
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ :
कोरोना वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यवतमाळ जिल्ह्यातील सहा तालुक्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली होती आता या संचार बंदीचा कालावधी आज मध्यरात्री संपणार असल्याने कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी यांनी आज नवीन आदेश काढून सुरु असलेल्या सहाही तालुक्यातील संचारबंदी पुढील आदेशापर्यंत कायम ठेवन्यात आली आहे .तर उर्वरित तालुक्यातील दुकानांच्या वेळेमध्ये बदल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी जारी केले आहे.
यवतमाळ, दारव्हा, नेर ,पुसद ,दिग्रस, पांढरकवडा शहर व शहरालगत चा भागात १४ जुलै च्या आदेशानुसार ३१ जुलैपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली होती. आता या संचारबंदी चा कालावधी आज (ता.३१) मध्यरात्री संपणार असल्याने यवतमाळ दारव्हा ,नेर ,पुसद,दिग्रस, पांढरकवडा, या शहरातील संचारबंदी पुढील आदेशापर्यंत कायम ठेवण्यात आली आहे. तर या सहाही तालुक्याच्या शहर व शहराला लगतील ग्रामीण भागाच्या व उर्वरित तालुक्यातील सर्व अत्यावश्यक सेवा व इतर सेवेची दुकान सकाळी दहा ते दोन वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची मुभा देण्यात आली होती. त्यामध्ये आता जिल्हाधिकारी यांनी सदर आदेश काढून या प्रतिष्ठानच्या दुकानांच्या वेळेत बदल करून सकाळी ६ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकारी एम .देवेंद्र सिंह यांनी आज सायंकाळी आदेश जारी केला आहे .

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..