ढाणकी परिसरातील मन्याळी येथील 18 वर्षीय युवकाची हत्या
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
स्वप्नील चिकाटे : ९९७०५३५९८८
ढाणकी :
उमरखेड तालुक्यातील बिटरगाव पोलीस स्टेशन पासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या मन्याळी गावांमध्ये शेतात जागलीला गेलेल्या युवकाची धारदार शस्त्राने हत्या केल्या गेली
अमोल निवृत्ती काळबांडे व शरद सावरकर हे दोघेही आपापल्या शेतामध्ये जागल करण्याकरिता गेले.
रात्रीच्या सुमारास अंदाजे एक वाजता शेता मध्ये शेजारी असलेले शेत-शिवार लागून असलेले अमोल व शरद या दोघांमध्ये वाद निर्माण झाला त्यात अखेर अमोल काळबांडे वय १८ यांची हत्या धार धार शस्त्राने शरद मनोहर सावतकर वय 25 यांनी केली रात्रीच्या वेळी शेतामध्ये कोणी नसल्याने सावतकर यांनी अमोल निवृत्ती काळबांडे यास जागीच ठार मारले व सावतकर यांनी स्वतः पोलीस स्टेशन मध्ये जाउन स्वताला पोलिसांच्या स्वाधीन केले तीन दिवसा अगोदर शरद आणि मृत अमोल यांच्या वडिलांमध्ये भांडण लागले होते त्याचाच राग म्हणून अमोल ची हत्या करण्यात आली असे स्थानिकांनी सांगितले आहे
मयताचे वडील निवृत्ती काळबांडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार शरद मनोहर सावकर वय 25 यावर भादवि कलम 302 प्रमाणे बिटरगाव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास बिटरगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार विजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रामकिसन जायभाय व त्यांचे सहकारी तपस करीत आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..