बंदी घातलेली ३६ चिनी अॅप्स भारतात पुन्हा सुरू….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “भारताने २०२० मध्ये २६७ चिनी अॅप्सवर बंदी घातली होती. सुरक्षा, डाटा प्रायव्हसी आणि गलवान व्हॅलीतील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारताने तेव्हा निर्णय घेतला होता. पण आता त्यातील काही अॅप्स आता पुन्हा प्ले स्टोअरवर दिसत आहेत.
किमान ३६ अॅप्स प्ले स्टोअरवर जसे आहेत तसे किंवा नव्या नावाने, रिब्रँडिंग करून पुन्हा उपलब्ध झाले आहेत. काही अॅप्सने रिब्रँडिंग केले गेलेय तर काहींनी मालकी हक्क बदलले आहेत. कायदेशीररित्या अॅप्स चालवता यावेत यासाठी भारतीय कंपन्यांशी करार करण्यात आले आहेत.
भारतात पुन्हा सुरू झालेल्या अॅपमध्ये झेंडर, मँगोटीव्ही, युकू, ताओबाओ, टँटन यासारख्या अॅप्सचा समावेश आहे.
Xender- फाइल शेअरिंग अॅप अप आताही Xender म्हणूनच पुन्हा अॅपल अॅप स्टोअरवर आलंय. मात्र अद्याप गुगल प्ले स्टोअरला आलं नाही.
Mango TV : चिनी स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म असलेल्या मँगो टीव्हीचं अॅपही आता दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध झालंय. त्याचं कोणतंही रिब्रँडिंग न करता किंवा मालकी हक्क न बदलता ते दोन्ही प्ले स्टोअरवर दाखवत आहे.
Youku : हे चिनमध्ये व्हिडीओ स्ट्रिमींग सेवा पुरवतं. तेसुद्धा आता प्लेस्टोअरवर उपलब्ध झालं आहे.
Taobao : अलिबाबा कंपनीचं शॉपिंग अॅप असलेलं ताओबाओ रिब्रँडिंग न करता पुन्हा भारतात सुरू झालंय.
Tantan हे डेटिंग अॅप असून ते एशियन डेटिंग अॅप म्हणून परतलं आहे.
भारतात ३६ अॅप्स पुन्हा सुरू झाली असली तरी टिकटॉक परतण्याची मात्र कोणतीही चिन्हे दिसत नाहीत.
अॅप्स कशी परतली?
काही अॅप्सनी स्ट्रॅटेजिक रिब्रँडिंग केलं. तर काहींनी निर्बंध टाळण्यासाठी मालकी हक्क बदलले. यात फॅशन शॉपिंग अॅप असलेल्या शीनने रिलायन्ससोबत भागिदारी केली. यामुळे त्यांचा डेटा स्टोरेज भारतातच राहील आणि तो सुरक्षित राहील. २०२० मध्ये बंदी घतलेलं PUBG मोबाईल हे अॅप दक्षिण कोरियाच्या क्राफ्टनच्या माध्यमातून Battlegrounds Mobile India म्हणून परतलं. मात्र या अॅपवरही २०२२ मध्ये बंदी घातली केली. पण भारताच्या सुरक्षा गाइडलाइन्सचं पालन केल्यानंतर २०२३ मध्ये या अॅपला परवानगी दिली गेली.
अॅपवर बंदी घालणं कठीण
सरकारने बंदी घालण्यासाठी जे नियम तयार केलेत त्या नियमांना पळवाट शोधून काही अॅप्स पुन्हा भारतीय बाजारात परतण्याचे पर्यायी मार्ग शोधतात. सिंगापूर, व्हिएतनाम, दक्षिण कोरिया, सेशेल्स, जपान किंवा बांगलादेशमधील कंपन्यांकडे अॅप्सची मालकी असते. अशा वेळी कंपन्यांचा मूळ मालक कोण हे शोधणं आणि ट्रॅक करणं कठीण होतं. याशिवाय इतर स्थानिक नियमांचं पालन करण्यासाठी अॅप्स तयार करणाऱ्या या कंपन्या भारतीय कंपन्यांसोबत करार आणि भागिदारी करतात.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….