ठाकरेंच्या खासदारांचं एकीचं बळ, दिल्लीत वज्रमूठ दाखवली, मात्र पत्रकार परिषदेला 11 पैकी 8 खासदार उपस्थित..!
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- “शिवसेना ठाकरे गटाचे 6 खासदार शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या रंगली आहे.
सध्या ठाकरेंचे 9 खासदार लोकसभेत आहेत. त्यापैकी 6 खासदार शिंदे गटात दाखल होऊ शकतात असं समजतंय.
विधानसभा निवडणुकीतील दारूण पराभवानंतर ठाकरे गटात मोठी अस्वस्थता आहे. अनेकांना त्यांच्या राजकीय भवितव्याची चिंता लागली आहे. त्यामुळे ठाकरेंचे 6 खासदार शिवसेना शिंदे गटात जाणार असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र या चर्चांना ठाकरेंच्या सर्व खासदारांनी एकत्र पत्रकार परिषद घेत पूर्णविराम दिला.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व खासदारांनी आज (7 फेब्रुवारी) दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. ठाकरेंचे लोकसभेत 9 खासदार आणि राज्यसभेत 2 खासदार आहे. लोकसभा आणि राज्यसभा मिळून ठाकरे गटाचे एकूण 11 खासदार आहे. या 11 खासदारांपैकी 9 खासदार पत्रकार परिषदेला उपस्थित होते, तर 3 खासदार गैरहजर होते.
अनिल देसाई, अरविंद सावंत, राजाभाऊ वाजे, भाऊसाहेब वाकचौरे, संजय देशमुख, ओमराजे निंबाळकर, संजय (बंडू) जाधव, नागेश पाटील आष्टीकर हे खासदार पत्रकार परिषदेला उपस्थित होते.
संजय दिना पाटील (लोकसभा), संजय राऊत- (राज्यसभा), प्रियंका चर्तुवेदी (राज्यसभा) ठाकरे गटाच्या सर्वपक्षिय खासदाराच्या पत्रकार परिषदेला अनुपस्थित होते. अरविंद सावंत यांनी यामागचं कारण देखील सांगितलं. संजय दिना पाटील, संजय राऊत आणि प्रियंका चतुर्वेदी दिल्लीतच आहेत. काँग्रेसचे नेते राहुल गांधी पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यासाठी तिघंही त्याठिकाणी गेले आहेत,अशी माहिती अरविंद सावंत यांनी दिली.
ठाकरेंच्या खासदारांनी दिल्लीत एकत्र येत वज्रमूठ दाखवली. तसेच उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंच्या नावाने घोषणाही दिल्या. यावेळी ठाकरे गटाच्या खासदारांचं एकीचं बळ पाहायला मिळालं.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….