भाजपने चिटींग करून महाराष्ट्रात निवडणूक जिंकली..? राहुल गांधींनी थेट पुरावाच दिला..?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- “लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मोठा घोळ झाला आहे. या निवडणुकांचा अभ्यास केला असता यातमध्ये अनेक धक्कादायक प्रकार घडले आहेत. पाच महिन्यातच मोठ्या संख्येने मतदार कसे वाढले ?
असा सवाल करत लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार प्रहार केला आहे. आज दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधी यांनी अनेक खुलासे केले आहेत. यावेळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे देखील उपस्थित होत्या.
यावेळी राहुल गांधी म्हणाले की, महाराष्ट्राच्या निवडणुकीसंदर्भात आम्ही सविस्तर अभ्यास केला. यामध्ये आम्हाला या निवडणुकीत हेराफेरी झाल्याचे निर्देशनात आले. महाराष्ट्राच्या मतदारस याद्यांमध्ये आम्हाला अनेक अनियमितता दिसून आली. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान ३९ लाख मतदार वाढले. असा दावाही राहुल गांधी यांनी केला आहे. तसेच शिर्डीत एकाच कॉलीनीत मतदार वाढले असल्याचेही त्यांनी सांगितले.
पाच महिन्यातच इतके मतदार कसे वाढले ? महाराष्ट्रात लोकसंख्येपेक्षा जास्त मतदार कसे ? आम्हाला फोटोसह मतदार याद्या द्या. अशी मागणीही त्यांनी केली. याबाबत आता तीन मोठे पक्ष निवडणुक आयोगाकडे मतदार याद्या मागत आहेत. काही तरी चूक असल्यानं निवडणूक आयोगाकडून आम्हाला उत्तर दिली जात नाहीत. असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….