उद्धव ठाकरेंना जागा दाखवली अन् शरद पवारांना ., अमित शाहांची जहरी टीका….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
शिर्डी :- “भारतीय जनता पक्षाकडून आज शिर्डीमध्ये राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनात बोलताना केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांना कानमंत्र दिले.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे आणि अनेकमंत्री उपस्थित होते.
या अधिवेशनात बोलताना केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह म्हणाले की, शरद पवार यांनी 1978 पासून दगाफटक्याचे राजकारण केले होते मात्र या विधानसभा निवडणुकीत तुम्ही त्या राजकारणाला 20 फुट जमिनीत गाडण्याचे काम केले. अशी टीका गृहमंत्री अमित शाह यांनी शरद पवार यांच्यावर केली.
तर उद्धव ठाकरे यांच्यावर देखील अमित शाह यांनी जोरदार हल्लाबोल केला. यावेळी अमित शाह म्हणाले की, या विधानसभा निवडणुकीत तुम्ही उद्धव ठाकरेंना त्यांना त्यांची जागा दाखवण्याचे काम केले आहे. तसेच महाराष्ट्रात आतापर्यंत अस्थिरतेचे राजकारण सुरू होते मात्र आता स्थिर सरकार आले आहे. असं देखील अमित शाह म्हणाले.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण आणि लाडक्या शेतकऱ्यांमुळे आपला विजय झाला आहे. तसेच या निवडणुकीत हे सिद्ध झालं आहे की, एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना आणि अजित पवारांची खरी एनसीपी आहे. असं देखील अमित शाह म्हणाले. तसेच 2019 मध्ये उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले. अशी टीका देखील उद्धव ठाकरे यांच्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर केली. याच बरोबर दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप जिंकणार आणि सरकार स्थापन करणार असा विश्वास देखील यावेळी अमित शाह यांनी व्यक्त केला.
2024 भाजपसाठी महत्वाचे
2024 भाजपसाठी महत्वाचे राहिले असं देखील अमित शाह म्हणाले. 2024 मध्ये नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनले. तर हरियाणा, सिक्कीम आणि महाराष्ट्रात भाजपला सलग तिसऱ्यांदा जनादेश मिळाला. तर ओडिशामध्ये पहिल्यांदाच भाजपची सत्ता आली आणि आंध्र प्रदेशात एनडीएला पहिल्यांदाच बहुमत मिळाले, असेही यावेळी अमित शाह म्हणाले.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….