पंकजा मुंडे नांदेडच्या पालकमंत्री? चर्चा आहे..! खासदार चव्हाण म्हणाले, तो…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “मंत्री पंकजा मुंडे या नांदेडच्या पालकमंत्री होणार असल्याच्या चर्चा आहेत. यावर नांदेडमधील नेते भाजप खासदार अशोक चव्हाण यांनी एका वाक्यात प्रतिक्रिया देत विषय संपवला.
तो फार मोठा विषय नाही. मराठवाड्यातील विषय आहे. काही जण बोलत असतील तर त्या लोकांच्या भावना आहेत. त्या व्यक्त केल्या असतील”, असे खासदार चव्हाण यांनी म्हटले.
भाजपचे खासदार अशोक चव्हाण शिर्डी येथे अधिवेशनाला आले होते. साई समाधीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना मंत्री पंकजा मुंडे नांदेडच्या पालकमंत्री पदाच्या चर्चेत आहेत, या प्रश्नावर त्यांनी तो फार मोठा विषय नाही. एवढीच प्रतिक्रिया दिली.
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू आहे. ‘स्थानिक’च्या निवडणुकांना सामोरे जाताना, स्थानिक पातळीवरील नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन भाजप निर्णय घेणार आहे”, असे खासदार चव्हाण यांनी सांगितले.
‘या महाविजय अधिवेशनातून आम्ही नवीन ऊर्जा घेऊन जात आहोत. मोठ्या ताकतीने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये यश मिळवू. विधानसभा निवडणुकीत जनतेने आम्हाला खूप मोठा यश दिलं. त्यामुळे त्यांचे आभार मानावेच लागणार. भाजपची सभासद नोंदणीची प्रक्रिया स्थानिक पातळीवर वेगाने सुरू आहे या अधिवेशनानंतर ते अधिक वेगाने करू’, असेही खासदार चव्हाण यांनी म्हटले.
“महाविकास आघाडीत आता बिघाडी होताना दिसत आहे. महाविकास आघाडी विस्कळीत झालेली दिसते. आघाडीत काही नाही, एकवाक्यता नाही. दिल्लीमध्ये पहातोय काय सुरू आहे ते. दिल्ली विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत बिघाडी झाली असून काँग्रेस एकाकी पडली आहे”, असाही टोला खासदार चव्हाण यांनी लगावला.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या ‘या’ प्रलंबित मागण्या होणार पूर्ण….
स्वबळावर लढायची खाज असेल तर मिटवून टाकू; एकनाथ शिंदेंच्या आमदाराचा भाजपला कडक इशारा…..
पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणात रविंद्र धंगेकरांचा माघार घेण्यास नकार; एकनाथ शिंदेंचे नाव घेत म्हणाले, “शिवसेना हा.”
मोहोळांविरोधात रान उठवल्यामुळे शिवसेनेतून हकालपट्टी? चर्चा रंगताच धंगेकर स्पष्टच बोलले, म्हणाले…
मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरला; बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची राष्ट्रीय ताकद तेजस्वी यादव यांच्यामागे..!
आता महाराष्ट्रात मोठा राजकीय धमाका होणार…!