…तर उद्या १० वाजता मी स्वत:ला संपवून घेणार, संतोष देशमुख यांच्या भावाचा सरकारला इशारा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अटकेत असलेल्या आठ आरोपींविरोधात मकोका अर्थात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाईचा प्रस्ताव गुन्हे अन्वेषण विभागाने दिलेला आहे.
मात्र खंडणी प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडचे नाव ‘मकोका’मध्ये घेण्यात आलेले नसल्याने अनेक जण आश्चर्य व्यक्त करीत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार सुदर्शन घुले, प्रतिक घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे, विष्णू चाटे, सिद्धार्थ सोनवणे, महेश केदार आणि जयराम चांगे यांच्यावर संघटित गुन्हेगारी केल्याबद्दल ‘मकोका’ दाखल करण्यात आलेला आहे. मात्र मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड याच्यावरती केवळ खंडणीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. कराडचे नाव अपहरण तसेच खून प्रकरणात नसल्याने त्याच्यावर मकोका लावण्यात आलेला नाही.
…तर उद्या १० वाजता मी स्वत:ला संपवून घेणार
या सगळ्यावर संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी उद्विग्न भावना व्यक्त केल्या आहेत. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी स्वत:ला संपवून घेण्याचे विचार डोक्यात येत असल्याचे सांगितले. जर ‘त्या’ आरोपीला खुनाच्या आरोपात घेतले नाही आणि ‘मकोका’खाली गुन्हा दाखल केला नाही तर उद्या सकाळी १० वाजता मोबाईल टॉवरवर चढून मी स्वत:ला संपवून घेईल, अशा उद्विग्न भावना धनंजय देशमुख यांनी व्यक्त केल्या.
आपला भाऊ स्वत: संपला, माझ्या भावालाही समाधान वाटेल
जर या आरोपींना आत्ता सोडले तर हे माझाही खून करतील. माझ्या भावालाही समाधान वाटेल की आपला भाऊ स्वत: संपला, तो अशा पद्धतीने मारला गेला नाही. जर सरकारने त्या आरोपीवर मकोकाखाली गुन्हा नोंद केला नाही तर सोमवारी सकाळी १० वाजता गावातील टॉवरवर चढून मी स्वत:ला संपवून घेणार आहे, असा इशारा धनंजय देशमुख यांनी दिला आहे. खंडणी ते खून असा तपास सीआयडीने करणे अपेक्षित असताना त्याचे नाव मकोकाखाली का घेत नाही, असा सवालही देशमुख यांनी विचारला.
त्याच्यावर मकोकाखाली गुन्हा दाखल व्हायलाच हवा
संतोष देशमुख हत्या प्रकरणी आठ जणांविरुद्ध मकोका कायद्यान्वये कारवाईचा प्रस्ताव दिला गेला परंतु या प्रस्तावात वाल्मिक कराडचे नाव नसल्याचे देशमुख कुटुंबीय आक्रमक झाले आहेत. सरकारने त्यांच्यावरही मकोकाखाली गुन्हा दाखल करावा नाहीतर आम्हीच आमच्या जीवाचे बरे वाईट करून घेऊ, अशा उद्विग्न भावना देशमुख कुटुंबियांनी माध्यमांशी बोलून दाखवल्या.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या ‘या’ प्रलंबित मागण्या होणार पूर्ण….
स्वबळावर लढायची खाज असेल तर मिटवून टाकू; एकनाथ शिंदेंच्या आमदाराचा भाजपला कडक इशारा…..
पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणात रविंद्र धंगेकरांचा माघार घेण्यास नकार; एकनाथ शिंदेंचे नाव घेत म्हणाले, “शिवसेना हा.”
मोहोळांविरोधात रान उठवल्यामुळे शिवसेनेतून हकालपट्टी? चर्चा रंगताच धंगेकर स्पष्टच बोलले, म्हणाले…
मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरला; बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची राष्ट्रीय ताकद तेजस्वी यादव यांच्यामागे..!
आता महाराष्ट्रात मोठा राजकीय धमाका होणार…!