उमरखेड़ व महागाव तालुका २६ च्या मध्यरात्रीपासून संचारबंदी ; जिल्हाधिकारी यांचे आदेश
पॉलिटिक्स स्पेशल लाइव्ह
रियाज पारेख : ९६३७८८६७७७
महागाव :
यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील कोरोना बाधित यांचा आकडा शंभरी पार केला आहे.पुसद,पांढरकवड़ा,यवतमाळ, दिग्रस, दारव्हा, तालुक्यात कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ़ होत असल्याने संचारबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे आता नागरिकांचा अनलॉक असलेल्या तालुक्यात मुक्तसंचार वाढला असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे .त्यामुळे जिल्ह्यातील हॉस्पॉट ठरलेल्या पुसद तालुक्या शेजारील महागाव व उमरखेड तालुक्यात कोरोनाचा शिरकाव होऊ नये यासाठी तालुका प्रशासनाने जिल्हाधिकारी यांच्याकडे नुकताच लॉक डाउन करण्यासंदर्भात प्रस्ताव पाठविला होता. हा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांनी गांभीर्याने घेतले आहे. जिल्हाधिकारी यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारान्वये फौजदारी दंड संहिता १९७३ चे कलम १४४ (१)(३) अन्न व यवतमाळ जिल्ह्यातील महागाव व उमरखेड तालुका २६ जुलैच्या मध्यरात्रीपासून ३० जुलै मध्यरात्री पर्यंत संचारबंदी लागू करण्याचे आदेश दिले आहेत .
सदर संचारबंदी च्या कालावधीत विविध आस्थापने व सेवा संदर्भात व्यक्ती व समूहाला सूट देण्यात आली आहे त्याबाबत देशांमध्ये सविस्तरपणे निर्देश निर्गमित करण्यात आलेले आहेत.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….