जिल्ह्यात आज १४ जण नव्याने पॉझेटिव्ह ; १९ जणांची कोरोनावर मात
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ :
वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात भरती असलेले व सुरवातीला पॉझेटिव्ह आलेले 19 जण उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात आज (दि.21) नव्याने 14 पॉझेटिव्ह रुग्णांची भर पडली.
नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या 14 जणांमध्ये नऊ पुरुष व पाच महिला आहे. यात पुसद शहरातील रहमत नगर येथील एक पुरुष, नेर शहरातील शिवाजी नगर येथील एक पुरुष, यवतमाळ शहरातील इस्लामपुरा येथील एक पुरुष, यवतमाळ शहरातील तारपुरा येथील एक पुरुष व दोन महिला आणि यवतमाळ येथील पाच पुरुष व तीन महिलांचा समावेश आहे.
जिल्ह्यात सोमवारपर्यंत 156 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह होते. यात 14 जणांची भर पडल्याने हा आकडा 170 वर पोहचला.

मात्र ‘पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह’ झालेल्या 19 जणांना सुट्टी झाल्यामुळे ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 151 झाली आहे. यात विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेतील चाचणीद्वारे 81 तर रॅपीड ॲन्टीजन टेस्टद्वारे पॉझेटिव्ह आलेले 70 जण आहेत. जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 594 झाली आहे. यापैकी 423 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात 20 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात 96 जण भरती आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने आज 23 नमुने तपासणीकरीता पाठविले. सुरवातीपासून आतापर्यंत 10103 नमुने पाठविले असून यापैकी 9742 प्राप्त तर 360 अप्राप्त आहेत. जिल्ह्यात 9148 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.
०००००००

माळपठार भागातील रस्त्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाला पुसद काँग्रेसचे “अल्टीमेटम”
बारामतीमधून काँग्रेसची माघार, विजय वडेट्टीवार यांनी स्पष्टच सांगितले, ‘आमच्या वरिष्ठांशी…’
बारामतीच्या पोटनिवडणुकीबाबत काँग्रेसचा मोठा निर्णय..? रोहित पवार आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्या भेटीत काय घडलं..?
अवकाळीबाधीत शेतकऱ्यांना सरकारचा मोठा दिलासा ; आर्थिक मदत केली जाहीर….
बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार ; हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा, फडणवीसांचा तो शब्दही सांगितला..!
भारतीय राजकारणात मोठा बदल! संसद आणि विधानसभांमध्ये महिलांना ३३% आरक्षण लागू होणार..? विधेयकाला मोदी कॅबिनेटची मंजुरी….