२१ जुलै(मध्यरात्री) ते २८ जुलै पर्यंत पुसद दिग्रस मध्ये संचार बंदी लागू
कोरोना चा वाढता प्रादुर्भाव जिल्हाधिकारी यांनी दिले आदेश
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद
यवतमाळ फौजदारी प्रक्रिया दंड संहिता १९७३ चे कलम १४४ (१)(३) अन्वये यवतमाळ जिल्ह्यातील पुसद दिग्रस शहर आणि शहरालगतच्या परिसरात दिनांक २१ जुलै(मध्यरात्री) ते २८ जुलै २०२० च्या मध्यरात्रीपर्यंत संचारबंदी लागू करण्यात येत आहे असा आदेश यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी एम. देवेन्द्र सिंह यांनी दिनांक २० जुलै २०२० रोजी पारित केले. या संचारबंदी मधून खालील बाबी आस्थापना व्यक्ती व समूहाला सूट राहील.
👉 सर्व शासकीय कार्यालय त्यांचे संपूर्ण अधिकारी व कर्मचाऱ्यांसह सुरु राहतील. शासकीय कर्मचाऱ्यांना कार्यालयीन वेळेत ओळखपत्र बाळगणे आवश्यक आहे.
👉शासकीय व खाजगी दवाखाने सर्व औषधी दुकाने आरोग्य कर्मचारी वैद्यकीय रुग्णालय व अत्यावश्यक सेवा पशुवैद्यकीय दवाखाने,औषधालय 24×7)सुरू राहतील.
👉प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया यांचे संपादक वार्ताहार प्रतिनिधी वर्तमानपत्र वितरक त्यांना घरपोच वर्तमानपत्र वाटपाची मुभा राहील
रास्त भाव दुकाने बंद राहतील.
👉 आठवडी बाजार भाजीपाला फळ मार्केट बंद राहील
👉दूध विक्री आणि संकलन सकाळी 7 ते सकाळी10 व सायंकाळी सहा ते आठ या वेळेत सुरू राहतील.
👉जार वाटर सप्लायर यांना सामाजिक अंतराचे पालन करून सकाळी सात ते अकरा या वेळेत ग्राहकांना घरपोच सेवा देता येईल.
👉न्यायालयीन कामकाजासाठी परवानगी असेल
👉पेट्रोल पंप डिझेल पंप 10 ते दोन वाजेपर्यंत सुरू राहील. अत्यावश्यक सेवेकरिता 24×7सुरू राहील
👉रासायनिक खत विक्री बी बियाणे विक्री व वाहतुकीचे गोदामे बंद राहतील
शेतीच्या मशागती संपूर्ण शेतीच्या कामास मुभा राहील.
●पुसद व दिग्रस तालुक्यात बाहेर जाण्यासाठी व तालुक्यात प्रवेशासाठी केवळ वैद्यकिय किंवाअत्यावश्यक कारणाशिवाय इ पास आधारेच प्रवासाची मुभा राहील
●पुसदआणि दिग्रस तालुक्यातील सर्व बँकेचे कर्मचारी हे त्यांचे अंतर्गत कार्यालयीन कामकाज बँकेत उपस्थित राहून करू शकतील या व्यतिरिक्त बँकेत शासकीय कार्यालयाचे बँकेशी निगडित शासकीय व्यवहार चालू राहतील.इतर कोणत्याही ग्राहकांना बँकेत येण्यास प्रतिबंध राहील.
● शासकीय व खासगी बांधकामे बंद राहतील
● खाजगी प्रवासी वाहतूक बंद राहील
●टू व्हीलर थ्री व्हीलर फोर व्हीलर बंद राहील फक्त वैद्यकीय सेवा आणि अत्यावश्यक सेवेसाठी सुरू राहील
●चिकन मटन मच्छी मार्केट विक्री बंद राहील
●भाजीपाला विक्री भाजी मंडी बंद राहील
● हॉटेल बंद राहतील
●दारूची दुकाने बंद राहतील
●कृषी उत्पन्न बाजार समिती पूर्णतः बंद राहतील ●
●मॉर्निंग मॉर्निंग वॉक इविनिंग वॉक व जॉगिंग बंद राहील खेळणाच्या मैदानावर बंदी राहतील
यवतमाळ जिल्ह्यातील पुसद दिग्रस शहर तसेच शहरालगतच्या परिसरात हे आदेश लागू राहतील या आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे पालन न करणार्या कोणत्याही व्यक्ती संस्था अथवा समूह हे साथ रोग प्रतिबंधक कायदा 1897व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 आणि भारतीय दंड संहिता कलम 188 व इतर संबंधित कायदे व नियम यांचे अंतर्गत कारवाई करण्यात येईल तसेच यापूर्वीही निर्गमित केलेल्या आदेशानुसार दंडात्मक कारवाई सुद्धा करण्यात येईल असे आदेश एम.देवेन्द्र सिंह जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी काढले आहेत.