माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या स्मरणार्थ मोदी सरकार दिल्लीत स्मारक उभारणार…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- “भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे 26 डिसेंबर 2024 रोजी वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले. केंद्र सरकारने माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या सन्मानार्थ राष्ट्रीय राजधानी दिल्लीत स्मारक बांधण्याची घोषणा केली आहे.
स्मारकासाठी जागा देण्याच्या काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षांच्या विनंतीला प्रतिसाद म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयाने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे डॉ. मनमोहन सिंग यांच्या योगदानाचे स्मरण आणि सन्मान करण्यासाठी दिल्लीत स्मारक बांधण्याची माहिती शेअर केली आहे. 2004 ते 2014 या काळात काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारमध्ये पंतप्रधान राहिलेल्या डॉ. मनमोहन सिंग यांच्या स्मरणार्थ स्मारक बांधण्याची मागणी काँग्रेसने शुक्रवारी केली होती.
गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. मनमोहन सिंग यांच्या स्मारकासाठी जागा देण्याची माहीती काँग्रेस अध्यक्ष खर्गे आणि दिवंगत पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कुटुंबीयांना सरकारच्या निर्णयाची माहिती दिली. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आणि डॉ. सिंग यांच्या अंत्यसंस्काराच्या तयारीदरम्यान ही घोषणा करण्यात आली आहे.
काँग्रेस पक्षाने डॉ. सिंग यांच्या अंत्यसंस्कारासाठी आणि स्मारकासाठी जागा निश्चित करण्यात झालेल्या विलंबावर चिंता व्यक्त केली होती. हा भारताच्या पहिल्या शीख पंतप्रधानांचा अपमान असल्याचे म्हटले होते. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या स्मरणार्थ केंद्र सरकारने स्मारक बांधण्याची मोठी घोषणा केली आहे.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….