ते पंतप्रधान असताना मी भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन केलं, मनमोहन सिंग यांच्या निधनावर बोलले अण्णा हजारे….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “देशाचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं गुरुवारी रात्री दहा वाजता निधन झालं. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी दिल्लीतील एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर देशात ७ दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.
त्यांच्या पार्थिवावर शनिवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर देश विदेशातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही शोक व्यक्त करताना म्हटलं की, देशाच्या आर्थिक सुधारणांमध्ये मनमोहन सिंग यांचं मोठं योगदान होतं असं म्हटलंय.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीआधी युपीए सरकारविरोधात रामलीला मैदानात अण्णा हजारे यांनी आंदोलन केलं होतं. युपीए सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानं जनतेच्या मनात सरकारविरोधात रोष निर्माण झाला होता. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनावर सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी म्हटलं की, मनमोहन सिंग नेहमीच देशाबद्दल विचार करायचे. देशाची अर्थव्यवस्था बदलण्यात त्यांचं मोठं योगदान होतं.
मनमोहन सिंग जेव्हा पंतप्रधान होते तेव्हा मी भ्रष्टाचाराविरोधात आंदोलनाचं नेतृत्व करत होतो. मी दिल्लीत त्यांच्या निवासस्थानी अनेकदा त्यांना भेटलो होतो. ते खूप लवकर निर्णय घ्यायचे. आज मनमोहन सिंग यांचं निधन झालं पण त्यांच्या आठवणी नेहमीच जिवंत राहतील असंही अण्णा हजारे म्हणाले.
भ्रष्टाचाराविरोधात दिल्लीत रामलीला मैदानात अण्णा हजारे यांनी २०११-१२ मध्ये आमरण उपोषण केलं होतं. यामुळे तत्कालीन युपीए सरकारला मोठा दणका बसला होता. काँग्रेसच्या सत्तेला सुरुंग लागण्यास या आंदोलनानंतर सुरुवात झाली होती. याच आंदोलनानंतर अण्णा हजारे यांचे सहकारी असलेल्या अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पार्टी स्थापन करून राजकारणात एन्ट्री केली. विशेष म्हणजे दिल्लीत पहिलं सरकार स्थापन करताना आपने काँग्रेसचाच पाठिंबा घेतला होता.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….