‘एक देश, एक निवडणूक’ विधेयकाला कुणाचा पाठिंबा, कुणाचा विरोध?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- “देशभरात सध्या चर्चा चालू आहे ती एक देश एक निवडणूक अर्थात ‘वन नेशन, वन इलेक्शन’ विधेयकावर. लोकसभा व सर्व राज्यांच्या विधानसभा निवडणुका एकत्रच घेण्यासंदर्भात या विधेयकात तरतूद करण्यात आली आहे.
त्याशिवाय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही एकत्र घेण्यासंदर्भात या विधेयकामध्ये तरतुदी करण्यात आल्या असून मंगळवारी हे विधेयक लोकसभेमध्ये चर्चेसाठी मांडण्यात आलं. यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये या विधेयकावरून खडाजंगी पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर विधेयकाला समर्थन असणाऱ्या आणि विरोधात असणाऱ्या पक्षांच्या भूमिकांची चर्चा सुरू झाली आहे.
केंद्रीय मंत्रीमंडळानं १२ डिसेंबर रोजीच या विधेयकाला मंजुरी दिली आहे. त्यानंतर हे विधेयक लोकसभेत चर्चेसाठी मांडण्यात आलं आहे. तेव्हापासून सत्ताधारी व विरोधी अशा दोन्ही बाजूंनी विधेयकाच्या समर्थनार्थ व विरोधातील भूमिका मांडल्या जात आहेत. देशातील राजकीय सत्तासमीकरणं, एनडीएतील मित्रपक्ष, इंडिया आघाडीतील पक्ष, राज्याराज्यांमधील आघाड्या व त्यामधील पक्षांच्या भूमिका अशा अनेक गोष्टींच्या परिणामस्वरूप संसदेत पक्षांनी पाठिंबा वा विरोधाच्या भूमिका घेतलेल्या दिसून येतात.
संख्येचा विचार केल्यास भाजपासहीत एकूण ३२ पक्षांचा एक देश, एक निवडणूक विधेयकाला पाठिंबा असून १५ पक्षांचा या विधेयकाला विरोध आहे.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….