दादांना धक्का देणार भुजबळ? मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, बड्या नेत्यांचे फोन टाळले…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्तारात काही ज्येष्ठ नेत्यांना डावलण्यात आले. महायुतीने आपल्या पहिल्या मंत्रिमंडळाचा विस्तार करताना धक्कातंत्राचा वापर केला आहे. त्यामुळे या तिन्ही पक्षातील इच्छुक आणि त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी असल्याचे दिसून आले आहे.
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळहे नागपूरमधील हिवाळी अधिवेशन सोडून येवलामध्ये गेले आहेत. छगन भुजबळ आज मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.
महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. त्यामुळे छगन भुजबळ आणि त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे. नागपूरमध्येच भुजबळांनी राष्ट्रवादीच्या मेळाव्याकडेही पाठ फिरवली. त्यानंतर सोमवारी सभागृहात हजेरी लावल्यानंतर त्यांनी नाशिकची वाट धरली. ओबीसी समाजावर पकड असणारे छगन भुजबळ यांना डावलण्यात आल्याने ओबीसी संघटनाही नाराज आहेत. आता भुजबळांच्या भूमिकेकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
अजितदादांसह बड्या नेत्यांचे फोन टाळले?
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांची नाराजी कायम असल्याचे दिसून येत आहे. छगन भुजबळ यांना अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी फोन करून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण, छगन भुजबळ यांनी अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांचे फोन उचलले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. छगन भुजबळ यांची समजूत काढण्यासाठी राष्ट्रवादीकडून काही महत्त्वाचे नेते आज भुजबळ यांना भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
भुजबळ आता काय करणार?
छगन भुजबळ यांनी ज्या नागपूरमध्ये पहिल्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतली, तिथेच त्यांना जवळपास तीन दशकानंतर डावलण्यात आले. आता, या वयात भुजबळांसमोर मोठं राजकीय आव्हान आहे. समता परिषदेच्या माध्यमातून भुजबळ ओबीसींच्या प्रश्नावर सक्रिय आहेत. आता समता परिषद आणि समर्थक कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून आज आपला निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..