33 कॅबिनेट मंत्री, 6 राज्यमंत्री ; भाजपचे 19, शिवसेनेचे 11 आणि राष्ट्रवादीचे 9
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपूर :- “महायुतीच्या मंत्र्यांचा शपथविधी नागपूरमध्ये आज झाला. या मंत्रिमंडळात एकूण ३९ मंत्र्यांनी शपथ घेतली. यामध्ये ३३ कॅबिनेट मंत्री तर ६ राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. आज शपथविधी घेतलेल्यांमध्ये भाजपच्या १९, शिवसेनेच्या ११ आणि राष्ट्रवादीच्या ९ मंत्र्यांचा समावेश आहे.
शपथविधीनंतर मंत्रिमंडळाची पहिली बैठक होणार आहे. या बैठकीनंतर चहापानाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले असून यावर विरोधकांनी बहिष्कार टाकला आहे.
मंत्र्यांची पूर्ण यादी
चंद्रशेखर बावनकुळे, भाजप आमदार
भाजपचे प्रदेशाध्यक्ष असणाऱ्या चंद्रशेखर बावनकुळे यांना मंत्रिमंडळात संधी देण्यात आली आहे. मंत्रिमंडळ विस्तारात मंत्र्यांच्या शपथविधीमध्ये पहिली शपथ त्यांनी घेतली.
राधाकृष्ण विखे पाटील
२०१४ ते २०१९ राज्याचे माजी विरोधीपक्षनेते
महायुती सरकारमध्ये महसूल मंत्री
६ वेगवेगळ्या मुख्यमंत्र्यांसोबत काम
२ वेगवेगळी खाती सांभाळली
हसन मुश्रीफ
सहाव्यांदा विधानसभेत, मविआत ग्रामविकास मंत्री, महायुतीत वैद्यकीय शिक्षण मंत्री
चंद्रकांत पाटील – भाजप आमदार कोथरूड
भाजपचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस होते
महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष
२०१४ मध्ये सहकार पणन मंत्री, कृषी खात्यााच पदभार सांभाळला
फलोत्पादन आणि महसूल मंत्री म्हणून काम
२००८ पदवीधर मतदारसंघातून विधानपरिषद आमदार
२००९ मध्ये सावंतवाडीतून पहिल्यांदा आमदार
२०१४ पुणे पदवीधर मतदारसंघातून आमदार
२०१९, २०२४ कोथरूड आमदार
गिरीश महाजन, आमदार भाजप,
१९९५ ला पहिल्यांदा जामनेरमधन आमदार
आतापर्यंत सातव्यांदा विजय
जलसंपदा, ग्रामविकास मंत्री,
वैद्यकीय शिक्षण मंत्री
अतुल सावे , भाजप आमदार
संभाजीनगर पूर्व मतदारसंघातून आमदार
देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय
२०१४ पासून सलग तीनदा आमदार
२०२२ गृहनिर्माण मंत्री पदाची जबाबदारी
अशोक उईके, भाजप
२०१४ मध्ये विधानसभेवर पहिल्यांदा निवडून गेले
२०२४ मध्ये राळेगाव मतदारसंघातून आमदार
शंभूराज देसाई, शिवसेना
२००४ ते २०२४ सलग पाचवेळा पाटणमधून आमदार
२०१९ मध्ये मविआत गृहराज्यमंत्री पदाची जबाबदारी
२०२२ मध्ये महायुतीत पुन्हा गृहराज्यमंत्री
आशिष शेलार, भाजप
२०१३-१४ विधानपरिषदेवर आमदार
२०१४ वांद्रे पश्चिम विधानसभा आमदार
मुंबई क्रिकेट असोसिएशन उपाअध्यक्ष
बीसीसीआयचे खजिनदार
मुंबई भाजपचे अध्यक्ष
दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादी काँग्रेस
सलग तीन वेळा हर्षवर्धन पाटलांना पराभूत केलं
२०१४ पासून इंदापूरचे आमदार
२०१९ मध्ये महाविकास आघाडीत मंत्री
अजित पवार यांचे निकटवर्तीय
आदिती तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेस
२०१७ ते १९ रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष
२०१९ मध्ये श्रीवर्धनमधून आमदार
२०१४ मध्ये सलग दुसऱ्यांदा आमदार
२०१९-२२ महाविकास आघाडीत राज्यमंत्री
२०२४ मध्ये गोंदिया जिल्ह्याच्या पालकमंत्री
शिवेंद्रसिंहराजे भोसले, सातारा, भाजप
२००४ पासून सलग तीनदा राष्ट्रवादी आमदार
२०१९, २०२४ भाजप आमदार
पहिल्यांदाच मंत्री
छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज, सातारा राजघराण्याचे वारस
माणिकराव कोकाटे, शिवसेना
नाशिक जिल्हा बँकेचे संचालक
सहकार क्षेत्रात प्रदीर्घ काम
१९९९, २००४ शिवसेनेकडून आमदार
२०१९ मध्ये राष्ट्रवादीचे आमदार
सिन्नरमधून सलग पाचव्यांदा आमदार
पहिल्यांदा मंत्री
जयकुमार गोरे, भाजप,
पश्चिम महाराष्ट्रातील आमदार
माणमधून २००९ मध्ये पहिल्यांदा आमदार
२०२४ मध्ये सलग चौथ्यांदा विधानसभेवर
नरहरी झिरवाळ, राष्ट्रवादी
२०२४ मध्ये
२०२२ मध्ये विधानसभा उपाअध्यक्ष
२००९ ते २०१४ दिंडोरीतून आमदार
२०२४ मध्ये चौथ्यांदा आमदार
वंचितांसाठी काम करणारे नेते अशी ओळख
संजय सावकारे, भाजप
भुसावळमधून चार वेळा आमदार
२००९ मध्ये राष्ट्रवादीकडून आमदार
राज्यमंत्री, पालकमंत्री पदाची जबाबदारी
२०१४ मध्ये भाजपकडून आमदार
संजय शिरसाट, शिवसेना
२०२२ मध्ये शिवसेना प्रवक्ते
२०२४ मध्ये सिडकोचे अध्यक्ष
पहिल्यांदा मंत्री
सलगद चौथ्यांदा छत्रपती संभाजीनगरमधून आमदार
प्रताप सरनाईक, शिवसेना आमदार, ओवळा माजिवडा
१९९७मध्ये पहिल्यांदा नगरसेवक
२००९ ते २०२४ सलग आमदार
२००८ मध्ये राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश
भरत गोगावले, शिवसेना
२००९ ते २०२४ सलग चौथ्यांदा आमदार महाडमधून
२०२२ मध्ये शिवसेना प्रतोद
१९९२ मध्ये अपक्ष लढून पंचायत समितीवर
दोन वेळा रायगड जिल्हा परिषदेवर
पहिल्यांदा मंत्री
उदय सामंत
२००४ मध्य राष्ट्रवादीतून पहिल्यांदा आमदार
२०१३ मध्ये मंत्री, नगरविकास राज्य मंत्री
२०१८ मध्ये शिवसेना उपनेते
२०१८ म्हाडाचे अध्यक्ष
२०१९ मविआत उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री
जयकुमार रावल – भाजप आमदार
२००४, २०१४, २०२४ आमदार
२०१४ अन्न, औषध प्रशासन मंत्री, पर्यटन मंत्री
भाजपचे राष्ट्रीय युवा मोर्चाचे महामंत्री
पंकजा मुंडे – भाजप आमदार, विधानपरिषद
भाजपच्या राष्ट्रीय सचिव
२००९ मध्ये परळीतून विधानसभेत आमदार
२०१४ जलसंधारण, ग्रामविकास आणि महिला बालकल्याण मंत्री
२०२४ विधान परिषदेवर आमदार
गुलाबराव पाटील, शिवसेना आमदार, जळगाव ग्रामीण
२०२२ – पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री
जळगाव पालकमंत्री
२०२४ पाचव्यांदा आमदार
१९९५ शिवसेना जळगाव जिल्हाप्रमुख
१९९९ मध्ये पहिल्यांदा आमदार एरंडोल विधानसभा मतदारसंघातून
गणेश नाईक –
१९९० मध्ये शिवसेनेक़डून आमदार
१९९४-९५ पर्यावरण मंत्री
२००४, २०२४ राष्ट्रवादीकडून आमदार भाजपकडूनही आमदार
दादा भुसे, शिवसेना
२०२२ महायुतीत सार्वजनिक बांधकाम मंत्री
त्याआधी मविआ सरकारमध्ये कृषी मंत्री
२००४ मध्ये आमदार
मालेगाव बाह्य मतदारसंघातून सलग पाचव्यांदा आमदार
संजय राठोड, शिवसेना
२०१४ मध्ये राज्य मंत्री
२०१९ मविआमध्ये वनमंत्री
एकनाथ शिंदेंसोबत असताना यवतमाळ वाशिम पालकमंत्री
२००४ मध्ये पहिल्यांदा विधानसभा आमदार

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..