नागपुरात नव्या आमदारांचा शपथविधी, इकडे मुंबईत राज-उद्धव 5 स्टार हॉटेलमध्ये एकत्र…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळाचा आज विस्तार होत आहे. तब्बल 33 वर्षांनंतर राज्याच्या उपराजधानीत म्हणजे नागपुरात मंत्रिमंडळ विस्तार अन् शपथविधी पार पडत आहे. एकीकडे हा शपथविधी पार पडत आहे तर दुसरीकडे मुंबईत मोठी घडामोड पाहायला मिळत आहे.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघे भाऊ मुंबईत ताज लँड्स एन्ड या हॉटेलमध्ये एकत्र आल्याची माहिती मिळाली आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात एकत्र नसले तरी आज एका कौटुंबिक कार्यक्रमात ठाकरे बंधू एकत्र आले होते. एका खासगी कार्यक्रमात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही भाऊ एकाच फ्रेममध्ये दिसले. आज रश्मी ठाकरेंचे बंधू श्रीधर पाटणकर यांचा विवाह सोहळा मुंबईत ताज लँड्स एन्ड या हॉटेल पार पडला. या विवाहसोहळ्याला राज ठाकरेंनी हजेरी लावली. विशेष म्हणजे रश्मी ठाकरे यांनी यावेळी राज ठाकरेंचं स्वागत केले आहे.
दोन्ही भावांनी लग्नाला हजेरी लावली
रश्मी ठाकरे यांचे बंधू श्रीधर पाटणकर यांचे पुत्र शौनक पाटणकर यांच्या मुलाच्या लग्नात राज ठाकरेंनी हजेरी लावली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. मात्र एका कार्यक्रमात राज आणि उद्धव एकत्र आले तरी दोन्ही भावांची थेट भेट झाली नाही. उद्धव ठाकरे यांच्यावरील टीकेनंतर राज ठाकरेंनी या लग्नाला उपस्थिती लावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राज – उद्धव एकत्र यावे अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरु असताना राज पाटणकर कुटुंबियांच्या निमंत्रणाला मान देत दोन्ही भावांनी लग्नाला हजेरी लावली. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
विधासभेला मनसेला मोठा धक्का
राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आहेत. या निवडणुकीमध्ये महायुतीला यश आले. राज्यात सर्वात मोठा पक्ष भाजपा ठरलीये. शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गटाला देखील मोठे यश या निवडणुकीमध्ये बघायला मिळाले. लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला यश मिळाले आणि महायुतीला धक्का बसला होता. मात्र, विधानसभा निवडणुकीमध्ये सर्व चित्रच वेगळे बघायला मिळाले. राज ठाकरे हे महायुतीसोबत होते. मनसेने 128 ठिकाणी आपले उमेदवारही उभे केले. मात्र, मनसेचा एकही उमेदवार विजयी होऊ शकला नाही. राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरेंना देखील पराभवाला सामोरे जावे लागले.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..