‘मी नसल्याने काही फरक पडत नाही’, मंत्रिपद हुकल्यानंतर दीपक केसरकर बोलून गेले….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपूर :- “आज मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. मात्र यावेळी शिवसेना शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांची संधी हुकली आहे. मंत्रिपदाची संधी हुकल्यानंतर त्यांची आता पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. ते साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीमध्ये आले होते, त्यावेळी बोलत होते.
शपथविधी हा मंत्र्यांचा असतो, अधिवेशन हे आमदारांसाठी असते. उद्या सकाळपासून अधिवेशन सुरू होणार असून, मला सकाळी अधिवेशनसाठी जायचं आहे. त्याअगोदर मी साईदरबारी आलोय असं त्यांनी यावेळी म्हटलं.
मंत्रिपदावर प्रतिक्रिया
दीपक केसरकर यांना यावेळी मंत्रिपद मिळू शकलं नाही, यावर आता त्यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. माझी शिंदे साहेबांसोबत जबाबदारीबाबत कुठलीही चर्चा झालेली नाही. मी त्यांना एकदाच भेटलो होतो, तेव्हा खूप आमदरांची गर्दी होती. तेव्हा मलाच वाटलं आपल्या नेत्याला आपण किती त्रास द्यायचा. त्यानंतर मी त्यांना एकदाही भेटलो नाही. मंत्रीमंडळातून डावलने हा काय भाग नसतो. शिक्षण क्षेत्रात क्रांती करणारे निर्णय मी घेतले. मराठी भाषा विभाग हा दुर्लक्षित विभाग होता, त्याला मराठी भाषा धोरण दिलं. मी जे काही केलं त्यात मी समाधानी आहे. साईबाबा जे काही घडवतात ते चांगल्यासाठीच घडवतात.
मी अधीवेशनाला जाण्याअगोदर साईबाबांचे दर्शन घेत असतो. मी मंत्रिमंडळात असतो तर काल साईबाबांचे दर्शन घेऊन आज नागपूर विधानभवन येथे स्पेशल विमानाने गेलो असतो. मी नसल्यामुळे त्या ठिकाणी फार फरक पडत नाही. आमच्या विभागातील पदाधिकाऱ्यांना भेटून मी अभिनंदन केलं आहे, असं दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे.
दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, एकनाथ शिंदे हे एक फायटर नेते आहेत, परिस्थितीशी झुंज देत काम करण्याची क्षमता ते सिद्ध करत असतात. खरी शिवसेना कुणाची याचं योग्य उत्तर एकनाथ शिंदे यांनी जनतेकडून घेतलं आहे. एकनाथ शिंदे यांच्यात जे गुण आहेत ते एक शिवसैनिकाचे गुण आहेत. हे त्यांनी महाराष्ट्राला दाखऊन दिलं आहे, असं केसरकर यांनी म्हटलं आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..