राहुल गांधींनी प्रियांका गांधींची केली स्वत:शी तुलना ; बहिणीच्या पहिल्या भाषणाबाबत म्हणाले…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- “केरळ लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा विजय मिळवत काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी आता थटे संसदेत पोहोचल्या आहेत. संसदेबाहेर प्रचारसभा गाजवणाऱ्या प्रियांका गांधी यांनी आता संसदही गाजवली.
त्यांच्या संसदेतील पहिल्याच भाषणाची आज जोरदार चर्चा आहे. संसदेतील रखडलेल्या चर्चेच्या मुद्द्यावरून केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली.दरम्यान, त्यांच्या भाषणाचं राहुल गांधी यांनी तोंडभरून कौतुक केलंय.
पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत राहुल गांधी म्हणाले, ‘प्रियांका गांधींनी खूप चांगले भाषण केले. अप्रतिम भाषण दिलं. माझ्या पहिल्या भाषणापेक्षा चांगलं भाषण तिने केलं असं आपण म्हणुया.’
प्रियांका गांधी भाषणात काय म्हणाल्या?
देशातील राजकीय आणि सामाजिक स्थितीवर बोलताना आपल्या भाषणात प्रियांका गांधी म्हणाल्या की, आज जनतेला खरे बोलण्यापासून घाबरवले, धमकावले जात आहे. पत्रकार, विरोधी पक्षाचा नेता असो की एखाद्या विद्यापीठाचे प्राध्यापक, विद्यार्थी-कामगार संघटनांना गप्प बसवले जात आहे. कोणावर ईडी तर कोणावर सीबीआय यांच्या माध्यामातून खोट्या केसेस दाखल करून त्यांना तुरूंगात टाकले जाते. विरोधकांना तुरूंगात टाकून त्रास दिला जात आहे. या सरकारने कोणाला सोडले नाही. यांनी देशातील वातावरण भीतीने भरून टाकले आहे. यांची मिडियाची मशीन खोटी माहिती पसरवते आणि वेगवेगळे आरोप करते. पण कदाचित ती देखील भीतीखालीच जगत आहेत.”
प्रियांका गांधींनी सत्ताधाऱ्यांमध्ये चर्चा करण्याची हिंमत नसल्याचा दावा केला आहे. देशातील परिस्थिती गंभीर असल्याचे सांगत त्या म्हणाल्या की, “मी आठवण करून देऊ इच्छिते की असे वातावरण देशात इंग्रजांच्या काळात होते. जेव्हा या बाजूला बसलेले गांधींच्या विचारधारेचे लोक स्वातंत्र्याची लढाई लढत होते आणि त्या बाजूच्या विचारधारेचे लोक भीतीमध्ये राहून इंग्रजांबरोबर हातमिळवणी करत होते. पण भीतीचा देखील आपला एक स्वभाव असतो, भीती पसरवणारे देखील स्वत: भीतीचे लक्ष्य ठरतात. हा निसर्गाचा नियम आहे. हे भीती पसरवण्याची यांना इतकी सवय झाली आहे की तेच भीतीच्या सावटाखाली राहत आहेत. हे (सत्ताधारी) चर्चेला आणि टीकेला घाबरतात. आम्ही किती दिवसांनी चर्चा करण्याची मागणी करत आहोत, पण यांच्यात चर्चा करण्याची हिंमतच नाही”.

महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….
मोदी-शहांचे स्वप्न पूर्णत्वाकडे..! बंगालमध्ये भाजपने पार केला बहुमताचा आकडा; २ दशकांनंतर सत्तांतर, ममतांना मोठा धक्का….