दिल्लीतील संमेलन स्थळाला छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी नाव….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- “दिल्ली येथे तालकटोरा स्टेडियम येथे २१ ते २३ फेब्रुवारी २०२५ दरम्यान या काळात होणाऱ्या ९८व्या अखिल भारतीय साहित्य संमेलन स्थळाला छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला.
महामंडळ तसेच सरहद या संस्थेने हा निर्णय घेतल्याचे महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे तसेच सरहद संस्थेचे संजय नहार यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
साहित्य संमेलनाला येणाऱ्या रसिकांसाठी पुणे-दिल्ली रेल्वे देण्याबाबत केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी स्वतः अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन विनंती केली आहे आणि माननीय रेल्वेमंत्री यांनी त्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला. मात्र, एका रेल्वेत मर्यादित साहित्य रसिकांना समाविष्ट करणे शक्य असल्याने या रेल्वेवर अवलंबून न राहता महाराष्ट्रातील साहित्य रसिकांनी आपापल्या भागातून आपले दिल्लीसाठी आरक्षण करावे म्हणजे ऐनवेळी गडबड होणार नाही, असेही आवाहन संयोजकांनी केले आहे.
संमेलनाला येणाऱ्यांची सोय करणे शक्य व्हावे, यासाठी आपल्या जवळच्या साहित्य संघात अथवा ऑनलाइन प्रतिनिधी शुल्क भरून दि. १५ जानेवारी २०२५ पूर्वी नोंदणी करावी काही अडचण आल्यास ८४८४०५५२५२ या क्रमांकावर संपर्क साधावा. ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सुविधा देण्याचा प्रयत्न राहील. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठीचे प्रतिनिधी आवेदन पत्र नोंदणी लिंक

महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….
मोदी-शहांचे स्वप्न पूर्णत्वाकडे..! बंगालमध्ये भाजपने पार केला बहुमताचा आकडा; २ दशकांनंतर सत्तांतर, ममतांना मोठा धक्का….