बसच्या चाकाखाली चिरडून महिलेचा मृत्यू ; गौळ (खुर्द) बस थांब्यावरील वरील घटना
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
गौळ (खुर्द)/ पोफाळी :
उमरखेड येथे जाण्याकरिता एसटी बस पकडताना बसच्या चाकाखाली येऊन एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला ही घटना गौळ खुर्द बस स्टॉपवर मंगळवारी दुपारी घडली. सखुबाई हौसाजी ससाने राहणार राजेंद्र प्रसाद वार्ड उमरखेड असे या मृत महिलेचे नाव असून त्या गौळ खुर्द येथे आपल्या मुलीला भेटणेसाठी आल्या होत्या. मुलगी रूक्मीनबाई गिरधारी कांबळे यांना भेटून त्या उमरखेड ला परत जात असताना गौळ खुर्द बस स्टॉप वर आल्या बस स्टॉप वर पुसद आगाराची पुसद उमरखेड एम एस 40 वाय 5646 या क्रमांकाची बस उभी होती. घाईघाईने बसमध्ये बसताना चाकाखाली येऊन चिरडून त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी पोफाळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार कैलास भगत यांनी भेट देऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविलाआहे.

माळपठार भागातील रस्त्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाला पुसद काँग्रेसचे “अल्टीमेटम”
बारामतीमधून काँग्रेसची माघार, विजय वडेट्टीवार यांनी स्पष्टच सांगितले, ‘आमच्या वरिष्ठांशी…’
बारामतीच्या पोटनिवडणुकीबाबत काँग्रेसचा मोठा निर्णय..? रोहित पवार आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्या भेटीत काय घडलं..?
अवकाळीबाधीत शेतकऱ्यांना सरकारचा मोठा दिलासा ; आर्थिक मदत केली जाहीर….
बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार ; हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा, फडणवीसांचा तो शब्दही सांगितला..!
भारतीय राजकारणात मोठा बदल! संसद आणि विधानसभांमध्ये महिलांना ३३% आरक्षण लागू होणार..? विधेयकाला मोदी कॅबिनेटची मंजुरी….