खळबळ : यवतमाळ जिल्ह्यात आज कोरोनाचा अकरावा बळी ; दिवसभरात आठ पॉझेटिव्ह तर तिघांना डिस्चार्ज
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ ( ५ जुलै) :
आज जिल्ह्यात आणखी एका कोरोनाबधित रुग्णाचा मृत्यु झाला. तसेच दिवसभरात आठ पॉझेटिव्ह रुग्णांची भर पडली. तर वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात भरती असलेले व सुरवातीला पॉझेटिव्ह आलेले तीन जण उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
रविवारी नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या आठ जणांमध्ये दिग्रस येथील पुरुषाचा मृत्यु झाला. तर इतर सात जणांमध्ये यवतमाळ येथील दोन पुरुष व एक महिला, दारव्हा येथील एक पुरुष व दोन महिला आणि पुसद येथील एका पुरुषाचा समावेश आहे. शनिवारी जिल्ह्यात ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांचा आकडा 63 होता. यात रविवारी आठ जणांची भर पडल्यामुळे ही संख्या 71 वर गेली. यात एकाचा मृत्यु झाल्याने ही संख्या 70 झाली होती. मात्र ‘पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह’ झालेल्या तीन जणांना आयसोलेशन वॉर्डातून सुट्टी देण्यात आल्यामुळे ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 67 झाली आहे. सद्यस्थितीत वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात 89 जण भरती आहे.
गत 24 तासात वैद्यकीय महाविद्यालयाला 163 रिपोर्ट प्राप्त झाले. यात आठ पॉझेटिव्ह, 153 रिपोर्ट निगेटिव्ह तर दोन नमुने पुन्हा पॉजिटिव्ह आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत पॉझेटिव्ह रुग्णांचा आकडा 321 वर पोहचला आहे. यापैकी तब्बल 243 जण उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली तर जिल्ह्यात 11 जणांच्या मृत्युची नोंद आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने रविवारी 55 नमुने तपासणीकरीता पाठविले. सुरवातीपासून आतापर्यंत एकूण 5653 नमुने प्रयोगशाळेत पाठवले असून यापैकी 5339 प्राप्त तर 314 रिपोर्ट अप्राप्त आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 5018 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहे.
0000000