महायुती-मविआला किती जागा मिळणार, ठाकरे-शिंदेचे काय होणार..? ; ओपिनियन पोलचे आकडे समोर…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- विधानसभेची निवडणूक तोंडावर आल्याची साक्ष महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी देताना दिसत आहे. महायुती आणि महाविकास आघाडी या दोन प्रमुख आघाड्यांतील पक्ष रणनीती आखताना दिसत आहे.
इतर छोटे पक्षही मोर्चेबांधणी करतानात दिसत आहे. पण, खरी लढत महायुती विरुद्ध मविआ अशीच असणार आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीचा अंदाज वर्तवणारा एक ओपिनियन पोल समोर आला आहे. भाजपला धक्का बसण्याचा अंदाज आहे.
ओपिनियचा पोलनुसार, भाजपच्या जागा घटणार असल्या तरी महायुतीला 137-152 जागा मिळण्याचा अंदाज आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीला 129-144 जागा मिळू शकतात, असा या ओपिनियन पोलचा अंदाज आहे.
कोणत्या पक्षाला किती जागा मिळू शकतात? कंसात मतांची टक्केवारी
भाजप – 83-93 (26.2)
शिवसेना (शिंदे) – 42-52 (16.4)
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) – 07-12 (2.8)
काँग्रेस – 58-68 (16.2)
शिवसेना (ठाकरे) – 26-31 (14.2)
राष्ट्रवादी (शरद पवार) – 35-45 (13.7)
अन्य – 03-08 (10.1)
महाविकास आघाडीने निवडणुकीआधी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर केल्यास?
सरकारात्मक परिणाम होईल – 29 टक्के
नुकसान होऊ शकते – 43 टक्के
विशेष परिणाम होणार नाही – 14 टक्के
सांगता येत नाही – 14 टक्के
अजित पवार शरद पवारांसोबत जाऊ शकतात का?
होय – 43 टक्के
नाही – 33 टक्के
सांगता येत नाही – 22 टक्के
अजित पवारांसोबतच्या युतीवर भाजप आणि आरएसएस मतभेदांचा परिणाम होईल का?
परिणाम होणार नाही – 36 टक्के
प्रचंड परिणाम होईल – 39 टक्के
काही प्रमाणात परिणाम होईल – 22 टक्के
सांगता येत नाही – 3 टक्के
मराठा आरक्षण मुद्द्याचा महायुतीवर काय परिणाम होईल?
नुकसान हाईल – 34 टक्के
फायदा होईल – 24 टक्के
कोणताही परिणाम होणार नाही – 31 टक्के
सांगता येत नाही – 11 टक्के
माझी लाडकी बहीण योजनेचा निवडणुकीवर किती परिणाम होईल?
खूप जास्त परिणाम होईल – 58 टक्के
काही प्रमाणात परिणामकारक – 24 टक्के
कोणताही फायदा होणार नाही – 6 टक्के
माहिती नाही/ सांगू शकत नाही – 5 टक्के
लाडका भाऊ (मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना) योजनेचा किती परिणाम होईल?
चांगला परिणाम होईल – 36 टक्के
काही प्रमाणात परिणाम होईल – 33 टक्के
कोणताही परिणाम होणार नाही – 22 टक्के
सांगता येत नाही – 9 टक्के
मुख्यमंत्रिपदासाठी तुमचा आवडता चेहरा कोण?
एकनाथ शिंदे – 37 टक्के
उद्धव ठाकरे – 21 टक्के
देवेंद्र फडणवीस – 21 टक्के
शरद पवार – 10 टक्के
इतर – 11 टक्के
दलित मतदारांची पसंती असलेली आघाडी कोणती?
महायुती – 43 टक्के
महाविकास आघाडी – 32 टक्के
इतर आघाडी – 21 टक्के
सांगू शकत नाही – 4 टक्के
आदिवासी मतदारांची आवडती आघाडी कोणती?
महाविकास आघाडी – 42 टक्के
महायुती – 34 टक्के
इतर आघाडी – 14 टक्के
सांगता येत नाही – 10 टक्के