महायुती की महाविकास आघाडी ? विधानसभेला कोण मारणार बाजी? नवा सर्व्हे काय सांगतो पहा…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “सध्या महाराष्ट्रात विधानसभेचे वारे वाहू लागले आहेत. सगळ्याच राजकीय पक्षांनी पक्षबांधणीला सुरुवात केली आहे. जवळजवळ महाराष्ट्रातील सर्व प्रमुख पक्षांनी आपल्या सर्व्हेला सुरुवात केली आहे.
यादरम्यान आता मुंबईतील लोकपोल या संस्थेचा सर्वे समोर आला आहे. या सर्वेनुसार महाविकास आघाडीची राज्यांमध्ये सत्ता येण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. हा सर्व्हे काय सांगतो चला पाहुयात…
विभागनिहाय कोणत्या पक्षांना किती जागा मिळणार?
मुंबई
एकूण जागा 36
महायुती 10 ते 15 जागा मिळण्याचा अंदाज
महाविकास आघाडीचा 20 ते 25 जागा मिळण्याचा अंदाज
इतरांना 0 ते 1 जागा मिळू शकते
ठाणे व कोकण विभाग
एकूण जागा 39
महायुती 25 ते 30 जागा मिळण्याचा अंदाज
महाविकास आघाडीला 5 ते 10 जागा मिळण्याचा अंदाज
इतरांना 1 ते 3 जागा मिळण्याचा अंदाज
पश्चिम महाराष्ट्र
एकूण जागा 58
महायुती 20 ते 25 जागा मिळण्याचा अंदाज
महाविकास आघाडी 30 ते 35 जागा मिळण्याचा अंदाज
इतरांना 1 ते 5 जागा जागा मिळण्याचा अंदाज
मराठवाडा
एकूण जागा 46
महायुती 15 ते 20 जागा मिळण्याचा अंदाज
महाविकास आघाडी 25 ते 30 जागा मिळण्याचा अंदाज
इतरांना 0 ते 2 जागा मिळू शकतात
खानदेश
एकूण जागा 47
महायुती 20 ते 25 जागा मिळण्याचा अंदाज
महाविकास आघाडी 20 ते 25 जागा मिळण्याचा अंदाज
इतरांना शून्य ते दोन जागा मिळू शकतात
विदर्भ
एकूण जागा 62
महायुती 15 ते 20 जागा मिळण्याचा अंदाज
महाविकास आघाडी 40 ते 45 जागा मिळण्याचा अंदाज
तर इतरांना 1 ते 5 जागा मिळण्याचा अंदाज
या सर्वेनुसार महाविकास आघाडीला 141 ते 154 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे तर महायुतीला केवळ 115 ते 118 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.