वृत्तपत्रा वरील गुन्हे मागे घेण्याची पत्रकार संघाचे मागणी तहसीलदार मार्फत मुख्यमंतत्र्यांना दिले निवेदन
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
महागाव
औरंगाबाद वरून प्रकाशित होणाऱ्या दिव्यमराठी वृत्तपत्राने काही दिवसांपूर्वी २०६ नागरिकांचा मारेकरी कोण असे वृत्त प्रकाशित केले होते. या वृताला चिडून दिव्यमराठीचे राज्य संपादक संजय आवटे यांच्या वर सूडबुद्धीने विविध कलमानवे गुन्हे दाखल करण्यात आले. हा प्रकार अशोभनीय असून वृत्तपत्रा वर एकप्रकारे घाला घालण्याचेच काम करण्यात आल्याने संपादका वरील गुन्हे मागे घेण्यात यावे अशी मागणी महागाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने तहसीलदारा मार्फत मुख्यमंत्र्याना निवेदन देण्यात आले.
पत्रकारिता हे लोकशाही चौथा आधारस्तंभ आहे. सत्य वस्तुती व पाठपुरावा करणे आणि ते जणते समोर मांडण्याचे कार्य दै दिव्यमराठी सातत्याने करीत आहे. त्याला अनुसरून औरंगाबाद येथील कोरोना संदर्भातील सत्य परिस्थितीचा आढावा जनते समोर उघड केल्याने स्थानिक प्रशासनाचे वाभाडे निघाले याचा राग मनात ठेवून स्थानिक प्रशासनाने दिव्यमराठीचे संपादक प्रकाशक वार्ताहर यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहे. पत्रकारांच्या विरोधात गुन्हे दाखल करणे म्हणजे दडपशाही करून लोकशाहीचा गळा घोटण्यासारखे आहे. असे प्रकार पुन्हा घडू नये म्हणून महागाव तालुका पत्रकार संघाच्या माध्यमातून या घटनेचा निषेध करण्यात आला. व संपादक प्रकाशक वार्ताहर यांच्या वर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची मागणी ही निवेदनातून करण्यात आली. यावेळी महागाव तालुक पत्रकार संघाचे अध्यक्ष गजानन वाघमारे, पत्रकार संजय पाटे, ज्ञानेश्वर ठाकरे, विनोद कोपरकर, कयुमखान पठाण, संतोष जाधव, रवी कावळे, रियाज पारेख, रवी वाघमारे, गणेश भोयर, अंकुश कावळे, फराज पठाण सह आदी पत्रकार उपस्थित होते.