धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या वृत्तनिवेदक अमिश देवगण वर कारवाई करा – महागावातील युवकांचे ठाणेदारांना निवेदन
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
महागाव
सूफी हजरत ख्वाजा गरीब नवाज ( रहे . ) यांच्या बद्दल अपमान शब्द वापरल्याबद्दल व धार्मीक भावना दुखवल्याबद्दल न्युज १८ इंडीया चे वृत्तनिवेदक अमिश देवगन यांच्यावर कारवाई करण्यासाठी समाज बांधवांनी महागाव ठाणेदार यांना निवेदन दिले आहे.सदर निवेदनातून , दिनांक १६/०६/२०२० रोजी न्युज १८ इंडीयाचे वृत्तनिवेदक अमिश देवगन याने भारतातील सर्व धर्मीय जनतेचे श्रध्दा स्थान असलेले अजमेर चे सुफी संत हजरत ख्वाजा नवाज ( रहे . ) यांच्या बद्दल अपमानकारक शब्द वापरले असुन ही बाब अतिशय निंदनीय व संतापजनक आहे . सदर न्यूज १८ इंडीयाचे वृत्तनिवेदक अमिश देवगन याची पार्श्वभुमिवर पाहता या मागेही त्यांनी जातीय द्वेष निर्माण होईल व समाजात तेढ निर्माण होतील असे कार्यक्रम अनेक वेळी प्रसारीत केले आहेत . तरी या घटनेने संपूर्ण समाजाच्या धर्मिक भावना दुखावल्या गेल्या असुन जन माणसात संतापाची लाट निर्माण झाली असून, सध्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभुमीवर रस्त्यांवर न उतरता फेसबुक , व्हॉटसअप या सारख्या सोशल मिडीया द्वारे नागरीक रोष व्यक्त करताना दिसत आहेत. तरी न्युज १८ इंडीयाचा वृत्तनिवेदक अमिश देवगन याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी या निवेदनातून केली. सदर मागणीचे निवेदन महागाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार दामोदर राठोड यांना देण्यात आले.
यावेळी मो. आकीफ मो आबीद उर्फ रानु कुरेशी, सैय्यद रफिक, मौलाना सैय्यद ताहीर, शेख सादिक, शेख फयाज, मो. रियाज अकबानी, निजाम अकबर, गणेश भवानकर, तेजस नरवाडे, टीपू सुल्तान, वाजिद शेख,वासीक कुरेशी आदी उपस्थित होते…