गौळ- बोथा रोडवर गांजाची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक # ५ किलो २०० ग्रॅम गांजा जप्त
पॉलिटिक्स स्पेशल लाइव्ह
प्रशांत भागवत : ९४२२८६७७४८
उमरखेड:
पोफाळी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गौळ ते बोथा रोडवर दुचाकीने गांजा तस्करी करणाऱ्या दोघांना पोफाळी पोलिसांनी अटक केली आहे. ही कार्यवाही काल (ता.२९) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास करण्यात आली आहे.
शेख फिरोज शेख मेहबूब (२८), शंकर श्रीराम शर्मा (२८) दोघेही राहणार काला पट्टा वार्ड क्रमांक ८ राजस्थानी व्यायाम शाळेजवळ रा. हिंगोली असे अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे.या तस्करीत आंतरराज्य टोळीचा सहभाग असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
पोफाळी पोलीस स्टेशनचे प्रभारी ठाणेदार कैलास भगत यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोफळी पोलिसांनी गौळ ते बोथा रोडवर असलेल्या बोर पूला कडे एका दुचाकी क्र. एम एच ३८ व्ही ७७५५ ने दोघे जण हिंगोली कडे गुंगकारक औषधी पदार्थ
असलेला गांजा घेवून जात असल्याची माहिती मिळाली.त्यानुसार प्रभारी पोलीस निरीक्षक यांनी बोर जवळ सापळा रचला. बोथ्या कडून गौळ कडे येणाऱ्या दुचाकीची चौकशी केली असता दुकाचीवर एक जण पाठीमागे एका पांढऱ्या रंगा चे पोता घेवून बसला होता.अधिक चौकशी केली असता पोत्यात पाच किलो २३० ग्राम गांजा अंदाजित किंमत ४९ हजार व दुचकि, मोबाईल, नगदी रोख मुदेमालासह असे एकूण १ लाख ४१ हजार जप्त करण्यात आले. पंचनामा करून आरोपींवर हे कृत्य केल्याप्रकरणी कलम ८ ( क) , २० ( क) ,२२ गुंगकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कार्यवाही सहाय्यक पोलीस अधिक्षक अनुराग जैन यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी ठाणेदार कैलास भगत पोलीस उपनिरीक्षक आशिष राठोड,एएसआय गणेश राठोड,राजेश पडोळे, संतोष हराळ,माधव गाढवे,सुनील केंद्रे,राहुल मडावी,यांनी केली आहे.