राज्य सरकारच्या टॅक्समुळेच इंधन दरवाढ – देवेंद्र फडणवीस
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
विशेष प्रतिनिधी :
अमरावती :
पेट्रोल, डिझेलची कॉस्ट सी थ्रू आहे. राज्याने पेट्रोल डिझेलवर टॅक्स लावल्यानेच पेट्रोल, डिझेलचे भाव वाढले आहेत. त्यामुळे हे कॉंग्रेसचे आंदोलन बेगडी आंदोलन आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केल.
सध्या देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती आता नव्वदीपार झाल्या आहेत. त्याविरोधात कॉंग्रेसच्या वतीने देभभर आंदोलन करण्यात आले. यावर फडणवीस म्हणाले, पेट्रोल-डिझेलचे दर आता कंपन्यांच्या हाती आहेत. ते सरकारच्या नियंत्रणातून मुक्त करण्याचा निर्णय कॉंग्रेसच्या राजवटीतच झाला. इंधन हे जीएसटीच्या कक्षेत नसल्याने त्यावर व्हॅट आकारला जातो.
राज्याने पेट्रोल, डिझेलवरील टॅक्स 1 रुपयावरून दोन रुपयांची वाढ करत एकूण तीन रुपये केला आहे.त्यामुळे राज्य सरकारनेच पेट्रोल, डिझेलचे भाव वाढवले आहेत. त्यामुळे कॉंग्रेस हे आंदोलन बेगडी आहे, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, कापूस खरेदी संदर्भात राज्य सरकार अपयशी ठरले आहे. विहित मुदतीत राज्य सरकार कापुस खरेदी करू शकले नाही, अशी टीकाही त्यांनी केली. तर केंद्र सरकार कापूस खरेदी करायला तयार होते. त्यासाठी केंद्राने राज्य सरकारला 5 हजार 700 कोटी रुपये दिलेत, असेही त्यांनी सांगितले.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..