अवैध देशी दारूची वाहतुक करणाऱ्या वाहनास पकडले . दोन अटकेत ; उपविभागीय पोलीस पथकाची कार्यवाही ; ४ लाख ८७ हजाराचा मुद्देमाल जप्त
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
उमरखेड :
मराठवाड्यातील हिमायतनगर येथुन तालुक्यातील चातारी येथे अवैधरित्या देशी दारूची वाहतुक करणाऱ्या वाहनासह दोन आरोपींना ४ लाख ८७ हजाराच्या मुद्देमालासह उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाने आज ता २७ रोजी सकाळी दहा वाजता अटक केली .
हेमंत श्यामलाल कुरील ( ३६ ) , अरविंद दिलीप सोनाळे ( २६ ) दोन्ही रा . चातारी असे आरोपीचे नाव असुन मराठवाड्यातील हीमायतनगर येथुन महीद्रा मॅक्सीमो कमांक एम एच ४५ एन २५२८ या वाहनाने चातारी येथे अवैध विक्री करण्यासाठी देशी दारू आणत असतांना शिवाजी चौक चातारी चेथे उपविभागीय पोलीस अधिकारी पथकाने पकडली . वाहनात असलेली देशी दारूचे १५ बॉक्स रुपये ३७ हजार ४४० रुपये व ४ लाख ५० हजार असा एकूण ४ लाख ८७ हजाराचा मुद्देमाल जप्त करन दोघांना अटक केली . सदर कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी अनुराग जैन यांच्या मार्गदर्शनाखाली पि एस आय महेश घुगे , मोहन चाटे , उमेश चव्हाण , शेख वसीम , युनुस भातनासे यांनी पार पाडली