अरे गोपीचंदा. लायकी पाहून बोलावं’; अजित पवारांचं पडळकरांना उत्तर
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या जहरी टीकेवर उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी भाष्य केलं. यावेळी त्यांनी पडळकरांवर सडकून टीका केली. ते साताऱ्यात बोलत होते.
आपली योग्यता काय? आपण बोलतो काय? याशिवाय आपण कुणाबद्दल बोलतोय? सूर्याकडे पाहून थुंकल्यावर थुंकी तोंडावरच उडते, अशा शब्दांत अजित पवार यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.
लायकी नसलेल्या लोकांनी बोलणं योग्य नाही. आपल्या समाजात प्रसिद्धी मिळवण्याचा हा त्यांचा प्रयत्न आहे. आपली पात्रता पाहून बोलावं.याशिवाय त्यांना जनतेनी जागा दाखवली आह, अशी टीका अजित पवारांनी केली आहे.
एखाद्याला नको तेवढं मोठं केल्याचा हा परिणाम आहे. पडळकरांचं बारामतीत डिपॉझिट जप्त झालं होतं, असं देखील अजित पवार यावेळी म्हणाले.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या ‘या’ प्रलंबित मागण्या होणार पूर्ण….
स्वबळावर लढायची खाज असेल तर मिटवून टाकू; एकनाथ शिंदेंच्या आमदाराचा भाजपला कडक इशारा…..
पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणात रविंद्र धंगेकरांचा माघार घेण्यास नकार; एकनाथ शिंदेंचे नाव घेत म्हणाले, “शिवसेना हा.”
मोहोळांविरोधात रान उठवल्यामुळे शिवसेनेतून हकालपट्टी? चर्चा रंगताच धंगेकर स्पष्टच बोलले, म्हणाले…
मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरला; बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची राष्ट्रीय ताकद तेजस्वी यादव यांच्यामागे..!
आता महाराष्ट्रात मोठा राजकीय धमाका होणार…!