पडळकरांच्या त्याआक्षेपार्ह वक्तव्यावर शरद पवारांची प्रतिक्रिया
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. यानंतर राज्यात विविध ठिकाणी पडळकर यांच्याविरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी पडळकर यांच्या वक्तव्याचा निषेध केला. दरम्यान, याबाबत शरद पवार यांना विचारले असता त्यांनी या प्रकरणावर सध्या स्पष्टपणे बोलण्यास नकार दिला. ते पुण्यात कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीसाठी आले होते.
शरद पवारांवर कऱण्यात आलेल्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गोपीचंद पडळकर यांचा पुतळा जाळून निषेध केलापुण्यात शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख आणि राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे हे कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आले होते. बैठकीनंतर शरद पवार यांना गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वक्तव्याबाबत विचारण्यात आले. यावर पवार म्हणाले की, मला बोलायचं आहे पण सध्या यावर बोलणार नाही पुन्हा कधीतरी सविस्तर बोलेन असं म्हणत प्रश्नाला बगल दिली.
पडळकरांविरुद्ध तक्रार दाखल दाखल
शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्या प्रकरणी भाजपचे गोपीचंद पडळकर यांच्याविरुद्ध सहकारनगर पोलिस ठाण्यात राष्ट्रवादीच्या नगरसेवकाने तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पडळकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही तक्रार अर्जाद्वारे करण्यात आली. भाजपने विधान परिषदेवर निवडून आणलेले आमदार गोपीचंद पडळकर यांनी चर्चेची कोणतीही पार्श्वभूमी नसतानाही राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..