चिंताजनक : जिल्ह्यात पुन्हा १५ पॉझेटिव्ह रुग्णांची भर ; तर २२४ रिपोर्ट निगेटिव्ह
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ :
गत दोन तीन दिवसांपासून ६३ वर स्थिरावलेल्या ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांच्या संख्येत मंगळवारी अचानक वाढ झाली. आज दिवसभरात १५ जणांचे रिपोर्ट पॉझेटिव्ह आले आहे. यात नेर येथील १० जण, दिग्रस आणि वणी येथील प्रत्येकी २ तर १ दारव्हा येथील व्यक्ती पॉझेटिव्ह आला आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला २६ रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी १५ पॉझेटिव्ह तर ११ निगेटिव्ह रिपोर्ट आहे. निगेटिव्ह रिपोर्ट आलेल्यांमध्ये दारव्हा येथील सहा, नेर येथील तीन, वणी व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात ॲक्टीव्ह पॉजिटिव्ह रुग्णांची संख्या ७८ आहे. तसेच २४ तासात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला २२४ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहे.
वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात ८२ जण भरती आहे. वैद्यकीय महाविद्यालयाने सुरवातीपासून आतापर्यंत एकूण ३९७१ नमुने तपासणीकरीता पाठविले असून यापैकी २७७३ प्राप्त तर २९८ अप्राप्त आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉजिटिव्ह रुग्णांची संख्या २४७ आहे. यापैकी ७८ एक्टिव पॉजिटिव्ह असून १६१ लोकांना बरे झाल्यामुळे सुट्टी देण्यात आली आहे. जिल्ह्यात ८ लोकांच्या मृत्युची जिल्ह्यात नोंद असून सुरवातीपासून आतापर्यंत एकूण ३४५२ रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..