१०/१२वीच्या निकालासाठी आणखीन महिनाभर करावी लागणार प्रतीक्षा? ‘ही’ असू शकते निकालाची तारीख
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुने-
महाराष्ट्रात आता विद्यार्थी वर्गात दहावी बारावीच्या निकालाची उत्सुकता आहे मात्र अद्याप महाराष्ट्र शिक्षण बोर्ड मंडळाकडून निकालाच्या तारखे संदर्भात स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. कोरोना व्हायरसमुळे यंदा पेपर घेण्यापासून ते तपासणी पर्यंत सगळ्यातच विलंब झाला होता. परिणामी आता निकालासाठी सुद्धा आणखीन वाट पाहावी लागणार असल्याचे चिन्ह आहे. अलीकडे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावीचे निकाल जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लागणार असल्याचे संकेत दिले होते. सध्याची परिस्थिती पाहता साधारण 27 ते 28 जुलै पर्यंत निकाल लागू शकतो असे दिसून येत आहे.
पेपर तपासणीचे काम आता शेवटच्या टप्प्यात आहे. निकालाच्या तारखेबाबत योग्य माहिती जाणून घेण्यासाठी ‘mahresult.nic.in’ ऑफिशियल संकेतस्थळाला भेट द्या.
महाराष्ट्रामध्ये यंदा सुमारे 17 लाख 65 हजार 898 विद्यार्थी दहावीची परीक्षा दिली आहे. कोरोनाची दहशत असल्याने भूगोलाचा पेपर यंदा रद्द करण्यात आला आहे. या विषयाचे मार्क्स विद्यार्थ्यांना इतर विषयांच्या सरासरीने दिले जाणार आहेत अशी घोषणा मंडळाने केली आहे. तर बारावीचे पेपर संपल्यानंतर लगेचच लॉक डाऊन घोषित करण्यात आले होते. या निकालाची तारीख जाहीर होताच निकाल ऑनलाईन कसा पाहायचा याविषयी स्टेप बाय स्टेप माहिती जाणून घ्या.
10 वी, 12 वी चे ऑनलाईन निकाल कसा पाहाल?
# अधिकृत वेबसाईट mahresult.nic.in वर जा.
# या वेबसाईटवरील रिझल्ट लिंकवर क्लिक करा.
# त्यानंतर तुमचा सीट नंबर, रजिस्ट्रेशन नंबर आणि डेट ऑफ बर्थ इत्यादी माहिती टाकून एंटर करा.
# तुमचा निकाल स्क्रिनवर झळकेल. तो निकाल तुम्ही डाऊनलोडही करु शकता.