बनावट सोयाबीन बियाणांमुळे शेतकरी हवालदील

बियाण्यांच्या गुणवत्तेत फेरफार होऊ शकतो असा इशारा किसान सभेने दिला होता
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ-
मराठवाडा आणि दिर्भातील अनेक जिल्ह्य़ात सोयाबीनचे सदोष बियाणे वितरित झाल्यामुळे सोयाबीन पेरा वाया गेल्याच्या तक्रारी शेतकरी करीत आहेत. या फसवणुकीची सरकारने दखल घेऊन दुबार पेरणीसाठी मदत करावी अशी मागणी अखिल भारतीय किसान सभेने केली आहे. बियाण्यांच्या गुणवत्तेत फेरफार होऊ शकतो असा इशारा किसान सभेने दिला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व कृषिमंत्री दादा भुसे यांचे या समस्येकडे लक्ष वेधण्यात आले होते. तरीही खबरदारी न घेतल्याने सोयाबीनच्या बनावट बियाण्यांचे अनेक ठिकाणी वितरण झाले असून पेरा वाया जाण्याची परिस्थती निर्माण झाली आहे. मराठवाडा-विदर्भात परभणी, बुलढाणा, नांदगाव खांडेश्वर आदी भागात बनावट सोयाबीन बियाणे वाटप झाल्याचे समोर आले असून अन्य भागातूनही पेरा वाया गेल्याच्या तक्रारी येत असल्याची माहिती किसान सभेचे सरचिटणीस डॉ.अजित नवले यांनी दिली

‘तू आमच्या गुरुवर्यांना बोलायचं नव्हतं’, राष्ट्रवादी पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडेंवर शाईफेक….
गुणरत्न सदावर्ते यांच्या कारवर मनसैनिकांकडून शाईफेक….
सुनेत्रा पवारांची राज्यसभेची जागा कोण घेणार..? जय पवारांसह ६ नेत्यांची नावं चर्चेत, कोण होणार खासदार..?
विजय तामिळनाडूचा मुख्यमंत्री होणार की नाही हे ठरवणाऱ्या खऱ्या ‘किंगमेकर’चं महाराष्ट्र कनेक्शन….
भरती प्रक्रियेत भूमिपुत्रांसाठी आरक्षण, फडणवीस सरकारचा मास्टरस्ट्रोक, कुणाला होणार फायदा..?
तुम्हालाही हक्काची मिळणार जमीन ; भूदान चळवळीतील जमिनीबाबत राज्य सरकारचा सर्वात मोठा निर्णय…..