प्रफुल पटेलांना कोर्टाचा मोठा दिलासा..! ; ईडीने जप्त केलेली मुंबईतील 180 कोटींची घरे परत मिळणार….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- मुंबई कोर्टाने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांना मोठा दिलासा दिला आहे. सक्तवसुली संचालनालयाने पटेल यांचे १८० कोटी किंमतीचे मुंबईतील दोन घरं जप्त केले होते.
याप्रकरणी मुंबईच्या SAFEMA कोर्टाने ईडीचा निर्णय रद्द केला आहे. त्यामुळे पटेल यांच्यासाठी हा मोठा दिलासा आहे.
ईडीने दक्षिण मुंबईतील वरळी येथील पटेल यांच्या मालकीचे सीजे हाऊसचे बाराव्या आणि तेराव्या मजल्यावरील दोन घरे जप्त केली होती. या दोन घरांची किंमत जवळपास १८० कोटी आहे. हे दोन्ही फ्लॅट प्रफुल्ल पटेल यांच्या पत्नी वर्षा आणि कुटुंबियांच्या नावे नोंद आहेत.
ईडीने असा दावा केला होता की, ही संपत्ती बेकायदेशीरपणे इक्बाल मिरचीची पहिली पत्नी हजरा मेनन हिच्याकडून घेण्यात आली होती. इक्बाल मिरची हा ड्रग माफीया आणि गँगस्टर दाऊद इब्राहिम यांचा उजवा हात आहे. मिरची हा १९९३ मधील मुंबई ब्लास्ट प्रकरणातील दोषी आहे. त्याचा मृत्यू लंडनमध्ये २०१३ मध्ये झालाय.
कोर्टाने ईडीचा आदेश रद्द केला आहे. कोर्टाने स्पष्ट केलंय की, तपास यंत्रणेने प्रफुल्ल पटेल यांच्या संपत्तीविरोधात केलेली कारवाई बेकायदेशीर आहे. कारण, या संपत्तीचा आणि मनी लाँड्रिंगचा काही संबंध नाही. शिवाय ही घरे मिरची याच्याशी संबंधित असल्याचं समोर आलेलं नाही.
कोर्टाने पुढे म्हटलं की, ‘१४००० स्क्वेअर फुटाचे मेनन आणि त्याच्या दोन मुलांची सीजे हाऊसमधील संपत्ती स्वतंत्रपणे जप्त केलेली आहे. दोघांना यापूर्वीच फरार म्हणून घोषित केले आहे.’ कोर्टाच्या या निर्णयानंतर विरोधकांनी पुन्हा आरोप करण्यास सुरुवात केली आहे. भाजपच्या वॉशिंग मशिनमध्ये गेल्यावर सर्वजण स्वच्छ होतात, अशी टीका विरोधकांनी केली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, ‘या निर्णयामुळे ईडी, सीबीआय भाजपचा अंग असल्याचं स्पष्ट होत आहे.’

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..