अजित पवार गटाला बसणार मोठा धक्का..? ; दिलीप वडसे पाटील पुन्हा धरणार शरद पवारांची साथ…?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राज्यात लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाला चांगलं यश मिळालेलं नाही. त्यामुळे अजित पवार गटाच्या आमदारांमध्ये अस्वस्थता असल्याची चर्चा आहे. अजित पवार यांनी सर्व आमदारांची नुकतीच बैठकही घेतली आहे.

या बैठकीला सहा आमदार उपस्थित नव्हते. हे सर्व आमदार त्यांच्या वैयक्तिक कारणास्तव उपस्थित नव्हते असं अजित पवार यांच्याकडून सांगण्यात आलं होतं. पण आता अजित पवार गटातील एक मंत्री त्यांना पाठ दाखवण्याची चर्चा आहे. अजित पवार गटाचे मंत्री दिलीप वळसे पाटील हे पुन्हा एकदा माजी मंत्री शरद पवार यांची साथ धरणार असल्याची चर्चा आहे. वळसे पाटील यांच्या कन्या पूर्वा वळसे पाटील यांनी ट्विट केलेल्या पोस्टमुळे याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे.
शिरूर लोकसभा निवडणुकीत खासदार अमोल कोल्हे यांचा विजय झाल्यानंतर सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या कन्या पूर्वा वळसे पाटील यांनी अमोल कोल्हेंना विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. “डॉ अमोल कोल्हे साहेब यांचा दणदणीत विजय; मनःपूर्वक अभिनंदन”, असा मजकुर टाकत त्यांनी सोशल मीडीयावर खासदार कोल्हे यांचं अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत. तर बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे या विजयी झाल्याबद्दलही त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
पूर्वा वळसे पाटील तुतारी चिन्हावर निवडणूक लढवणार?
सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) या पक्षात येण्यास इच्छुक असल्याची सगळीकडे जोरदार चर्चा सुरु आहे. तर पूर्वा वळसे पाटील या आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून शरद पवार यांच्या तुतारी चिन्हावर निवडणूक लढविणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
रोहित पवारांचं सूचक वक्तव्य
दरम्यान, शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी याआधीच अजित पवार गटाला इशारा दिला आहे. “अजित पवार गटातील 18 ते 19 आमदार आमच्या संपर्कात आहेत. येत्या 15 दिवसात दिसेल”, असा दावा रोहित पवारांनी केला आहे. “आमच्यातील काही लोकं रात्री-बेरात्री जाऊन महायुतीच्या नेत्यांशी सेटिंग करत होते त्यांचे नावं लवकरच जाहीर करणार आहोत. अजित पवार गटातील आमदार शरद पवार गटात येणार हे येत्या 15 दिवसात दिसणार नाही, पुढच्या 15 दिवसात त्यांना निर्णय घ्यावे लागणार”, असं मोठं वक्तव्य रोहित पवारांनी केलं आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..